Saturday, October 31, 2026
BusinessLatest News

भारतात उपलब्‍ध ग्रीन फायनान्सिंगचे विविध प्रकार

ग्रीन फायनान्सिंग म्‍हणजे आर्थिक उत्‍पादने व सेवा जसे गुंतवणूका, कर्ज व क्रेडिट, जे पर्यावरणादृष्‍ट्या अनुकूल किंवा शाश्‍वत विकास-केंद्रित उपक्रमांना निधीसाह्य करतात. या प्रकारच्‍या निधीचा शुद्ध परिवहनाला प्राधान्‍य देणाऱ्या प्रकल्‍पांना मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. ज्‍यामुळे उत्‍सर्जन कमी करणाऱ्या वाहनांचा वापर होण्‍यास मदत होते. तसेच या प्रकारच्‍या निधीमुळे सौर ऊर्जा, पवनऊर्जा व बायोगॅस अशा नवीकरणीय ऊर्जा स्रोत निर्माण करू पाहणाऱ्या प्रकल्‍पांना देखील मदत होते. तसेच, हरित इमारतींनी हाती घेतलेले मोठ्या प्रमाणात रिसायकलिंग प्रकल्‍प देखील ग्रीन फायनान्सिंगसाठी पात्र आहेत, जे सामान्यत: सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र आणि ना-नफा क्षेत्राद्वारे वितरित केले जातात.

‘लँडस्केप ऑफ ग्रीन फायनान्स इन इंडिया २०२२’ अहवालानुसार, सार्वजनिक क्षेत्राचे योगदान हरित आर्थिक साह्य वाढवण्‍यामध्‍ये महत्त्वपूर्ण ठरले आहे, तर खाजगी क्षेत्रातील आर्थिक साह्य करण्‍याचे प्रमाण देखील १३० टक्‍क्‍यांनी वाढले आहे. अहवालात नमूद केले आहे की, शाश्वत भविष्यासाठी आणखी वाढ आवश्यक आहे. तेव्हापासून, भारतातील खाजगी क्षेत्र नवीन एनबीएफसी आणि हरित कर्जदारांची संख्या पाहता त्याच दिशेने पाऊल उचलत आहे. त्‍यांनी प्रदान केलेल्‍या काही फायनान्सिंग सेवांबाबत माहिती देत आहेत इकोफायच्या सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजश्री नाम्बियार.

१ . रूफटॉप सोलार लोन्‍स: ऊर्जेचा कार्यक्षम वापर हरित भविष्‍याच्‍या दिशेने वाटचाल करण्‍यासाठी अत्‍यंत महत्त्वपूर्ण आहे. भारतात उपलब्‍ध असलेल्‍या स्रोतांपैकी सौर ऊर्जेचा सर्वाधिक वापर केला जातो. तसेच यामध्‍ये रूफटॉप सोलार पॅनेल्‍सचे सर्वाधिक इन्‍स्‍टॉलेशन केले जाते. रूफटॉप सोलार पॅनेल्‍स घरांना वीज देण्‍यासह पाणी गरम करण्‍याचे कार्य देखील करतात, ज्‍यामुळे ग्राहकांच्‍या वीज बिलामध्‍ये बचत होते. रूफटॉप सोलार बसवणे अत्यंत फायदेशीर ठरले आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. रूफटॉप सोलारसंदर्भात सर्वात मोठी समस्‍या म्‍हणजे उच्‍च इन्‍स्‍टॉलेशन खर्च. पण, ग्रीन फायनान्सिंगच्‍या माध्‍यमातून या समस्‍येचे देखील निराकरण करण्‍यात आले आहे.

बँका व एनबीएफसी यासाठी कर्ज प्रदान करत असताना व्‍यक्‍ती मासिक ईएमआय भरत आणि कधी-कधी सांपर्श्विक प्रदान करत कर्ज घेऊन रूफटॉफ सोलार पॅनेल खरेदी करू शकतात.

२ . इलेक्ट्रिक वेईकल (ईव्‍ही) लोन्‍स: वायू प्रदूषण हे जागतिक तापमानवाढीसाठी मोठे कारणीभूत घटक आहे. वाहनांमधून घातक ग्रीनहाऊस वायू उत्‍सर्जित होत असताना इलेक्ट्रिक वाहने गेम चेंजर ठरली आहेत. इलेक्ट्रिक वाहनांमध्‍ये असलेली वैशिष्‍ट्ये जवळपास शून्‍य टेलपाइप उत्‍सर्जनाची खात्री देतात. वजनाने हलके, सुलभपणे ड्राइव्‍ह करता येण्‍याची क्षमता व आवाजविरहित अशा वैशिष्‍ट्यांमुळे परिवहनासाठी ईव्‍हींना अधिक पसंती मिळाली आहे. ईव्‍ही खरेदी करू पाहणाऱ्या व्‍यक्‍तींसाठी खाजगी क्षेत्र कार्सकरिता, तसेच दुचाकी व तीनचाकी वाहनांकरिता कर्ज देते, जे बँका व एनबीएफसीकडून दिले जाते. वाहनांवर बाय-बॅक्‍स व वॉरंटीबाबत चिंता असलेल्‍या ग्राहकांना देखील अशा संस्‍थांनी सोल्‍यूशन्‍स प्रदान केली आहेत.

३. एसएमई लोन्‍स: संस्‍था व व्‍यवसायांनी शाश्‍वतेला चालना देण्‍याप्रती पुढाकार घेण्‍यास सुरूवात केली आहे. त्‍यांच्‍यापैकी बहुतांश संस्‍था व व्यवसाय प्रदूषणाला प्रतिबंध, पुनर्चक्रणामध्‍ये गुंतवणूक करत किंवा नवीकरणीय ऊर्जेचा वापर करत कार्बनचे प्रमाण कमी करण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत. उदयास आलेले व्‍यवसाय व स्‍टार्ट-अप्‍स सक्रियपणे बाजारपेठेसाठी शाश्‍वत सोल्‍यूशन्‍सची निर्मिती करत आहेत. कार्बनचे प्रमाण कमी करणाऱ्या उपाययोजनांची अंमलबजावणी करायची असो किंवा तळागाळापासून हरित व्‍यवसाय सुरू करायचा असो या उपक्रमांना निधीची गरज आहे आणि ग्रीन फायनान्सिंग याबाबतील फायदेशीर ठरू शकते.

इतर उत्‍पादने जसे ग्रीन मॉर्टगेज व ग्रीन बॉण्ड्स देखील उपलब्‍ध आहेत आणि त्‍यामधून ग्रीन फायनान्सिंग उद्योग म्‍हणून विकसित होत असल्‍याचे निदर्शनास येते. पर्यावरणाचे जतन करण्‍याप्रती सहयोगासंदर्भात दाव्‍यांची विश्‍वसनीयता, हरित प्रकल्‍प म्‍हणजे काय याबाबतच्‍या विविध व्‍याख्‍या अशा समस्‍या असताना देखील भारतात डेटा आणि उपलब्ध स्त्रोतांची निर्मिती वेगाने होत आहे. खाजगी क्षेत्र व सार्वजनिक क्षेत्र पृथ्‍वीसाठी व पृथ्‍वीवरील मानवजातीसाठी सुरक्षित असलेल्‍या भविष्‍याला आकार देण्‍याप्रती योगदान देत आहेत. ज्‍यामुळे हे ध्‍येय साध्‍य होईल, अशी आशा आहे.

Leave a Reply