आदित्य बिर्ला समूहाने बिर्ला ओपस नावाने लॉन्च केला पेन्ट व्यवसाय
मुंबई : आदित्य बिर्ला समूहाची उपकंपनी असलेल्या ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेडने ‘बिर्ला ओपस’ नावाचा पेंट व्यवसायाचा नवीन ब्रँड सुरू केला आहे. बिर्ला ओपस पित्त वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीत मार्केटमध्ये उतरेल. ग्रासिमच्या वतीने सर्व प्रकारच्या उच्च प्रतीचे डेकोरेटिव्ह पेंट्स बाजारात उपलब्ध करून दिले जातील.
आदित्य बिर्ला समूहाचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला म्हणाले की, डेकोरेटिव्ह पेंट्स या क्षेत्रात उतरणे हे एक धोरणात्मक पाऊल असून त्यामुळे उच्च विकासाची संधी असलेल्या क्षेत्रात पाऊल ठेवून भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी आहे. ब्रँड संदर्भात आदित्य बिर्ला समूहावर असलेला विश्वास आणि त्याची शक्ती या आधारावर नवा पेंट व्यवसाय उभा राहील. गेल्या काही वर्षांमध्ये कंपनीने नव्या व्यवसायाचा एक सक्षम पाया उभा केला आहे. येत्या काही वर्षांमध्ये क्रमांक दोनची प्रॉफिटेबल कंपनी बनण्याचा आमचा विश्वास असून, त्यादृष्टीने घेण्यात येणाऱ्या निर्णयांमधले हा नवीन ब्रँड म्हणजे एक मह्त्तावचे पाऊल आहे. या लाँचच्या पार्श्वभूमीवर ग्रासिमने काही मेट्रो शहरांमध्ये पेंटिंग सेवा यशस्वीपणे सुरू केली असून, नव्या रेंजचे इंपोर्टेज वूड फिनिशेसही सादर केले आहे. महाराष्ट्रात अत्याधुनिक असा संशोधन आणि विकास प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
पेंट व्यवसायात १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ग्रासिमने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. कंपनीचे हरयाणा, पंजाब, तामिलनाडू, कर्नाटका, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल येथे अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प आहेत. त्यांची एकूण क्षमता दर वर्षी १,३३२ दशलक्ष लीटर एवढी आहे. देशभरातील डिमांड सेंटरद्वारे मागणीची पूर्तता केली जाणार आहे.
सध्या भारतातील डेकोरेटिव्ह पेंट इंडस्ट्रीची उलाढाल ७० हजार कोटींच्या आसपास आहे. लोकांची मागणी आणि सरकारची प्रत्येकासाठी घर ही योजना यामुळे पेंटची मागणी वाढत आहे. पेंट उद्योगात वार्षिक आधारावर दुहेरी अंकात वृद्धी झालेली पाहायला मिळली आहे.