सतत मिळणाऱ्या नकारांनी मी घडत गेलो! Hip Hop India चा विजेता राहुल भगत याची खास मुलाखत
अमेझॉन मिनी टीव्ही ही अमेझॉनची निशुल्क व्हिडीओ स्ट्रीमींग सेवा आहे. अमेझॉन टीव्हीवर नुकताच हिप हॉप इंडिया या डान्स रिअॅलिटी शोचा समारोप झाला. स्पर्धेत सामील झालेल्या स्पर्धकांनी सादर केलेले चित्तथरारक परफॉर्मन्स पाहताना प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फिटले होते. स्पर्धेचा विजेता घोषित होईपर्यंत ही स्पर्धा कोण जिंकणार हे सांगणं खूप अवघड होतं. अटीतटीच्या या स्पर्धेत राहुल भगत याने बाजी मारली आणि हिप हॉप इंडियाचा तो विजेता बनला. राहुलने स्पर्धेच्या विजेतेपदासोबतच ‘निस्सान मॅग्नाईट गेझा’ कारही जिंकली आहे. रांची ते या स्पर्धेपर्यंतचा राहुलचा प्रवास कसा होता हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्याची एक मुलाखत घेतली. पाहूया तो काय म्हणाला.
मुलाखतीतील ठळक मुद्दे:
1.तू आज डान्सर म्हणून घडला आहेस तो कसा घडलास ?
सातत्यपूर्ण कामगिरी हे मी विजेता बनण्यामागचे रहस्य आहे. प्रत्येक नकार हा मी मला मिळालेला एक धडा म्हणून स्वीकारला आणि माझी कामगिरी सुधारत नेली. यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो. आपले डान्सर बनण्याचे स्वप्न असल्याचे मी माझ्या आईवडिलांना सांगितले होते.मी डान्सर बनण्यासाठी पुष्कळ मेहनत केली असून मी माझा इथपर्यंतचा प्रवास हा अत्यंत काळजीपूर्वक आणि जाणीवपूर्वक केला आहे, यामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचू शकलो.
- हिप हॉप इंडियातील तुझ्या प्रवासाबाबत काय सांगशील?
जेव्हापासूनमी डान्सिंग क्षेत्र निवडलं तेव्हापासून मला ‘रिअॅलिटी शो‘मध्ये भाग घ्यायचा होता. माझी कोलकात्याला आणि मुंबईला ऑडीशन झाली होती. ऑडीशनमधून मुख्य स्पर्धेपर्यंत पोहोचणं हेच एक मोठं कठीण काम होतं, कारण देशभरात अनेक उत्तम डान्सर्स इथे आले होते.
माझा पहिला मुकाबला बस्क मॅन (सार्थक)शी झाला त्यानंतर अंशिकासोबत मुकाबला झाला. या दोघांबरोबरचा मुकाबला हा आयुष्यभर लक्षात राहील असा होता. विजेता घोषित होण्याआधीची काही मिनिटं ही हृदयाची धडधड वाढवणारी होती. आम्ही उतावळेपणाने निकालाची वाट बघत होतो, त्याचवेळी एकमेकांना आधार देण्याचेही काम करत होतो. ते क्षण मनामध्ये कायमचे कोरले गेलेले आहेत.
रेमो सर हे माझ्यासाठी आदर्श आहेत. मी नोरा फतेही मॅडमना आयुष्यात कधी भेटू शकेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात आलेल्या सोनेरी क्षणांपैकी एक आहेत. स्पर्धेचा अंतिम दिवस हा माझ्या आजवरच्या मेहनतीचे चीज करणारा होता. ही स्पर्धा देशातील सगळ्या अंडरग्राऊंड(हिप हॉप) आणि कमर्शिअल डान्सर्ससाठी खरंच खूप फायद्याची आहे.
- रेमो डिसूझा आणि नोरा फतेही हे दोघे स्पर्धेचे परीक्षक होते,त्यांच्याबाबत काय सांगशील?
रेमो सर हे तर सगळ्या डान्सर्ससाठी एक आदर्श आहेत. मी त्यांला माझ्या बालपणापासून पाहतोय. ते खऱ्या अर्थाने माझ्यासारख्यांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. त्यांची डान्सची शैली पाहिल्यानंतर ते मंचावरील साक्षात देव आहेत याची पुन्हा पुन्हा खात्री पटते. त्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या, जे सल्ले दिले त्यामुळे माझी कामगिरी प्रचंड सुधारली. त्यांना जेव्हा स्टेजवर डान्स करताना पाहणं यासारखं सुख नाही. त्यांची कोणाची स्पर्धाही होऊ शकत नाही आणि तुलनाही होऊ शकत नाही.
नोरा मॅडमच्या प्रतिक्रिया आणि सूचना या माझ्यासाठी मार्गदर्शक ठरल्या. स्वत:मध्ये सुधारणा करणे आणि कामगिरी उंचावणे यासाठी त्यांनी आम्हाला खूप मदत केली. नोरा मॅडम परीक्षक म्हणून समोर असताना त्यांच्यासमोर परफॉर्म करणं ही एक स्वप्नवत गोष्ट होती.
4.हिप हॉप इंडिया सेटवरील काही आठवणी सांगू शकशील ?
सेटवर धमाल असायची. धर्मेश सर हे एकदा पाहुणे परीक्षक म्हणून आले होते आणि तो दिवस मला अजूनही आठवतोय. त्यांनी माझं कौतुक केल्यानंतरची माझी प्रतिक्रिया ही फारच मजेशीर होती. सेटवर आम्ही सगळे एकेमकांना मदत करायचो. काही चुकलो तर त्यावर चर्चाही करायचो. आम्ही बरेवाईट दोन्ही दिवस अनुभवले. या शोच्या आठवणी मी कधीच विसरू शकणार नाही.
हिप हॉप इंडियाचे सर्व भाग आता अमेझॉन मिनी टीव्ही वर मोफत उपलब्ध आहेत! तुम्ही अमेझॉन मिनी टीव्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर वर किंवा अमेझॉन शॉपिंग अॅप मध्ये किंवा फायर टीव्ही वर पहा.