भाजपा-आरएसएस देशात दंगली घडवू शकतात – अॅड प्रकाश आंबेडकर
राम मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी एनएसजीकडे सोपवण्याची मागणी
मुंबई – देशामध्ये जातीय द्वेष आणि त्यातून हत्या घडवून आणण्याचा भाजप – आरएसएसचा इतिहास पाहता, हाच त्यांचा निवडणुका जिंकण्याचा पारंपरिक अजेंडा असल्याचे दिसते. देशात पुन्हा निवडणुका तोंडावर असताना गुजरात दंगलींप्रमाणे भारतातील लोकशाहीची आणि देशातील मुस्लिम, दलित आणि आदिवासी बहुजनांचा नरसंहार आणि हत्या करण्यास ते मागे पुढे पाहणार नाहीत ह्याची शक्यता वाटते. असे गंभीर विधान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. त्यांनी ट्वीट करत थेट भाजपा-आरएसएसवर हल्ला चढवला.
आपल्या ट्वीटमध्ये ते पुढे म्हणाले की, अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिराच्या उद्घाटनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी भाविकांना झेड+ सुरक्षा प्रदान करत असतांनाच श्रीराम मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी राष्ट्रीय सुरक्षा दलाकडे (एनएसजी) सोपवावी अशी मी गांभीर्यपूर्वक मागणी करत आहे. असं ट्वीट करत त्यांनी देशातील संभाव्य प्रमुख मुद्दयाकडे लक्ष वेधले आहे.
https://x.com/Prksh_Ambedkar/status/1701500921954615591?s=20
