fbpx
Saturday, September 30, 2023
Latest NewsPUNE

शिक्षक दिनानिमित्त शिवाजी मराठा आर्किटेक्चर महाविद्यालयात वृक्षारोपण

पुणे : श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या आर्किटेक्चर महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त पर्यावरणपूरक झाडे लावण्यात आली. त्यासोबतच शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी विशेष कार्यक्रम घेण्यात आला.

महाविद्यालयाच्या अरण्येश्वर कॅम्पसमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रमेश चव्हाण, रामप्रसाद अक्कीशेट्टी, संस्थेचे पदाधिकारी विकास गोगावले, जगदीश जेथे, विलास गव्हाणे, महाविद्यालयाचे विकास समिती अध्यक्ष डॉ. नितीन पवार, तानाजी घारे, सुरेश देसाई उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य बजरंग सुतार यांनी केले.
डॉ. नितीन पवार म्हणाले, शिक्षक हा समाजामध्ये संस्काराचा अविभाज्य घटक असून शिक्षक हे मुलांचे शैक्षणिक, सामाजिक मूल्यांकन करीत असतात. शिक्षकांमुळे समाजामध्ये परिवर्तन होत असते. चांगले विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षक करत असतात.

Leave a Reply

%d bloggers like this: