Saturday, October 31, 2026
Latest NewsPUNE

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत स्वच्छतेची दहीहंडी

पुणे : “सर्व कर्म समभाव मनात साठवून स्वच्छता हाच धर्म “हा चंग मनाशी बाळगून डी .ई .एस.चे बालगोपाळ छोट्या नटखट कान्ह्यासह शाळेतील सफाई कामगार वर्गासह स्वच्छतेची दहीहंडी फोडण्यासाठी साफ सफाईच्या सर्व सामग्री सह आज गोकुळाष्टमीच्या निमित्ताने डी .ई . एस .शाळेत अवतरले याप्रसंगी हाती घेतलेली स्वच्छता मोहीम मोठ्या दिमाखात जोरदार चालू होती. मनाची, शरीराची स्वच्छता हे आपले नैतिक कर्तव्य आहे, तर आपल्या घराची ,आपल्या शाळेची, आपल्या परिसराची स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे. असे स्वच्छतेचे धडे सर्व विद्यार्थ्यांनी माननीय मुख्याध्यापिका अर्चना धनावडे मॅडम प्रायमरी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली गिरवले. या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नागरिक म्हणून आपले साफसफाई चे कर्तव्य उत्तमरीत्या पार पाडावे असे आवाहन सेकंडरी विभागाच्या उपमुख्याध्यापिका विजया जोशी मॅडम यांनी केले. सकाळ सत्र पर्यवेक्षिका ग्रेसी डिसूजा यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
ढोल ताशाच्या गजरात गुरुजी रुपी विद्यार्थ्यांनी छोट्या बाळकृष्णाला वाजत गाजत शाळेत आणले . पारंपारिक पद्धतीने सर्व शिक्षकांनी औक्षण करून, पाळणा गाऊन, नृत्य करून, मनोरे रचून, याप्रसंगी स्वच्छतेची दहीहंडी फोडण्यात आली.

Leave a Reply