गोपालांनी साजरी केली Millets ची पौष्टिक दहीहंडी
पुणे : दर वर्षीप्रमाणे यंदाही टिळक रोड वरील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मुरलीधर लोहिया पुर्व प्राथमिक शाळेत दहीहंडी मोठय़ा उत्साहात आणि अनोख्या प्रकारे साजरी करण्यात आली. चालू वर्ष मिलेट्स वर्ष म्हणुन घोषित करण्यात आले आहे. हेच नेमके साधून शाळेमधे अशीच दहीहंडी साजरी करण्यात आली. मिलेट्सची चित्रे लावून सजविण्यात आली होती. सर्व बालगोपाल राधाकृष्णाच्या वेशभुषेत आली होती. गाण्याच्या तालावर मुलांनी दही हंडी फोडून आनंद लुटला.
मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यानी वेगवेगळी millets गोळा केली होती ती एकत्र करून वंचित विकास या संस्थेला मुलांच्या हातून दान करण्यात आली. समाजाप्रती आपली जबाबदारी असते याची जाणीव असावी म्हणुन हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाची संकल्पना माधुरी बर्वे यांची होती.
