फिया ग्लोबलची आर्थिक समावेशाला गती अहमदनगरमधील 36 स्वयं-सहायता गटांना 75 लाखांचे कर्ज वितरण
अहमदनगर : वित्तीय समावेशाचे आपले मिशन पुढे नेताना फिया ग्लोबलने गत सप्ताहात एक मोठा टप्पा गाठताना अहमदनगरमध्ये 36 स्वयं-सहायता गटांना (एसएचजी) 75 लाख रुपयांच्या कर्जाची यशस्वीरित्या नोंदणी केली. महिलांच्या नेतृत्वाखालील व्यवसाय आर्थिक संसाधनांमध्ये सहज प्रवेश करू शकतील तसेच त्यांना भरभराट होण्यासाठी आवश्यक असलेले पाठबळही मिळेल, असे वातावरण निर्माण करण्यावर फिया नेहमीच भर देते. फियाच्या महिला बँक “सखी” च्या समर्पित प्रयत्नांमुळे हे यश मिळाले आहे. सखींनी कृषी-तंत्रज्ञान व्यवसाय प्रतिनिधी (एटीबीसी) एजंट आणि बँकिंग ग्राहक सेवा पॉइंट (सीएसबी) स्थापन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. फिया ग्लोबलने ऊस पावडर मशीनमध्ये देखील गुंतवणूक केली, ज्याचा स्वयं-सहायता गटातील महिलांना एक संसाधन म्हणून खूप फायदा झाला आहे.
आपल्या वैयक्तिक संबंधांचा लाभ उठवताना फियाच्या सखींनी स्वयं-मालकीच्या व्यवसायांच्या मूल्यावर भर देत स्वयं-सहायता गटातील सदस्यांना अतिशय उत्कटतेने प्रेरित केले. या प्रयत्नातून केवळ व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना निधीच उपलब्ध करून दिला नाही तर कर्ज वाटप करणे आणि आवश्यक तांत्रिक सहाय्य देखील प्रदान केले आहे. फिया ग्लोबलच्या 40 फार्मर प्रोड्युसर कंपन्या (एफपीसी) महाराष्ट्रात कार्यरत आहेत. त्यांच्यासमोर एक संभाव्य बाजारपेठ उभी राहिली असून वाढ आणि परिणामासाठी नवीन मार्गांवरुन वाटचाल करण्याचे आश्वासनही या कंपन्याना देते. फिया ग्लोबल एका व्यापक ग्रामीण वितरण प्रणालीमध्ये गुंतवणूक करते, ज्यामध्ये 50 टक्के एजंट महिला आहेत. तसेच बँका, मायक्रो फायनान्स संस्था (एमएफआय), विमा कंपन्या, म्युच्युअल फंड आस्थापना आणि भारत सरकार यांसारख्या वित्तीय संस्थांसोबत भागीदारीचे विस्तृत जाळेही या प्रणालीने उभे केले आहे. या वित्तीय संसाधनांद्वारे, फिया ग्लोबल सर्वसमावेशक आर्थिक समावेशनाच्या उपायांची लक्षणीय प्रमाणात अंमलबजावणी करते.
आपले विचार व्यक्त करताना फिया ग्लोबलचे वसुली आणि संकलन विभागाचे प्रमुख नितीन पाटील म्हणाले, “फिया मोठ्या प्रमाणावर स्वयं-सहायता गटांबरोबर यशस्वीरित्या संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी बहुमूल्य वेळ देते, तसेच त्यांच्याशी निष्ठेने वचनबद्ध आहे. वित्तीय दरी कमी करण्यासाठी आमचे जलद प्रयत्न यामुळे खूपच सुलभ होतात. या सुनिश्चित धोरणांद्वारे, दक्षिण आशियाईतील आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबांना सेवा देण्यासाठी फिया यशस्वीपणे मार्गक्रमण करत आहे.”
