Sunday, July 26, 2026
BusinessLatest News

एयू स्मॉल फायनान्स बँकेतर्फे अतुलनीय लक्झरी लाभांसह  झेनिथ प्लस सुपर प्रीमियम क्रेडिट कार्डचे अनावरण

मुंबई आपल्या बँकिंग सोल्यूशन्सच्या सर्वसमावेशक पर्यायांना  एक नवीन जड देण्यासाठी एयू स्मॉल फायनान्स बँक झेनिथ फ्लस सुपर प्रिमियम मेटल क्रेडीट कार्ड सादर करण्यास उत्सुक आहे. हे सुपर प्रीमियम क्रेडिट कार्ड आधुनिक जीवनाच्या विविध पैलूंची पूर्तता करणारे भरपूर फायदे प्रदान करते. अखंड जागतिक प्रवासापासून ते अमर्यादित मनोरंजनाच्या पर्यायांपर्यंतप्रीमियम लाउंज प्रवेशापासून ते वैयक्तिकृत घरपोच सेवांपर्यंतहे कार्ड सामान्य व्यवहारांना असाधारण अनुभवांमध्ये रूपांतरित करते.

बँकेचे हे कार्ड लक्झरी आणि अनन्यतेचे मूर्त स्वरूप असून आर्थिक अनुभवांना त्याने नवी परिभाषा दिली आहे. एयू झेनिथ प्लस क्रेडिट कार्ड प्रीमियम ब्रँड व्हाउचरचा पर्याय अथवा 5000 रुपये किमतीच्या रिवॉर्ड पॉइंट्स ते अखंड जागतिक प्रवासासाठी 0.99% चे सर्वात कमी फॉरेक्स मार्कअप देतानाचप्रत्येक व्यवहाराला विशेषाधिकाराचे प्रतीक बनवून अपवादात्मक लाभांची श्रेणीही ग्राहकांना प्रदान करते. हे कार्ड 16 मोफत बोगो बूकमायशो चित्रपटाची तिकिटेविमानतळ लाउंजला 32 मोफत भेटी आणि 4 मीट अँड असिस्ट एअरपोर्ट चेक-इनची सुविधा देत ग्राहकांच्या संपूर्ण प्रवासात आरामाची हमी देते.

याशिवायएक वर्षाच्या ताज एपिक्युअर सदस्यत्वासह तेथे विशेष जेवणाच्या अनुभवांमध्ये सहभागी होताना प्रत्येक खर्च केलेल्या 100 रुपयांसाठी 2 रिवॉर्ड पॉइंट्स प्रदान करतेत्याचबरोबर  8 मोफत गोल्फ राउंड्स किंवा गोल्फ खेळण्याच्या प्रशिक्षणासह गोल्फिंग लक्झरीचा आनंद या कार्डच्या माध्यमातून ग्राहक  घेऊ शकतात.  मासिक बोनस रिवॉर्ड पॉइंट्सदररोज चोवीस तास घरपोच सेवा, 1% इंधन अधिभार माफी आणि रोख पैसे काढण्यासाठी शून्य फी या कार्डचे पॅकेज पूर्ण करते. एयू झेनिथ प्लस क्रेडिट कार्ड आर्थिक व्यवहारांना असाधारण अनुभवांमध्ये रूपांतरित करतेजे ग्राहकांच्या उच्च जीवनशैलीची स्थिती प्रकट करते.

पारदर्शक किंमत संरचना हे एयू झेनिथ प्लस क्रेडिट कार्डचे एक वैशिष्ट्य होय. या कार्डचे वार्षिक सदस्यत्व शुल्क जीएसटी करासह फक्त  4,999 रुपये इतकीच आहे. या कार्डच्या वापरातुन ग्राहक विशेषाधिकार आणि पुरस्कारांचे जग स्वतःसाठी खुले करू शकतात. या कार्डमुळे त्यांची जीवनशैलीही उंचावते आणि त्यांना अतुलनीय सुविधाही प्रदान केल्या जातात.

 

एयू स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ संजय अग्रवाल म्हणाले, “झेनिथ प्लस मेटल क्रेडिट कार्ड सादर करताना आम्हाला आमच्या ग्राहकांना अपवादात्मक मूल्य देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे एक प्रतीक म्हणून अभिमान वाटतो. ही ऑफर पारंपारिक बँकिंग आणि उच्चभ्रू वित्तीय सेवांमधील अंतर भरून काढण्याच्या आमच्या प्रयत्नांना अधोरेखित करते. एयू स्मॉल फायनान्स बँकेतआमचा विश्वास आहे की प्रत्येक ग्राहकाची आर्थिक पार्श्वभूमी काहीही असली तरी प्रीमियम फायद्यांच्या विश्वात प्रवेश मिळण्यास ते पात्र आहेत. झेनिथ प्लस क्रेडिट कार्ड हे ग्राहकभावना अंतर्भूत करताना  एकेकाळी विशेषाधिकारप्राप्त काही लोकांसाठी राखीव असलेल्या विशेष वैशिष्ट्यांचे दालनच आता सर्वांसाठी खुले करत आहे. हे कार्ड आमच्या ग्राहकांसाठी आर्थिक सशक्तीकरणाच्या एका नवीन युगाचे प्रतिनिधित्व करतेजिथे ते एयू कुटुंबाचा भाग असताना लक्झरी आणि सुविधांच्या जगाचा अनुभव घेऊ शकतात. हे आमच्या ग्राहकच-प्रथम‘ दृष्टिकोनाचे आणि जीवन उंचावण्याच्या दिशेने आमच्या प्रवासाचे मूर्त स्वरूप आहे.”

एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या क्रेडीट कार्ड व्यवसायाचे प्रमुख मयंक मार्कंडे  म्हणाले, “झेनिथ प्लस क्रेडिट कार्ड तयार करणे हे आमचे उद्दिष्ट होते आणि ते  केवळ लक्झरीच्या सर्वोच्च मानकांची पूर्तताच करत नाही तर सर्वसमावेशकता आणि नाविन्यपूर्णतेच्या आमच्या मूलभूत मूल्यांशी देखील प्रतिध्वनित होते.

थोडक्यातझेनिथ प्लस क्रेडिट कार्ड हे प्रत्येकाला लक्झरी मिळवण्यायोग्य बनवण्याच्या आमच्या विश्वासाचे प्रकटीकरण आहे. या कार्डद्वारेआम्ही केवळ उत्पादनच सादर करत नाहीतर आम्ही प्रीमियम क्रेडिट कार्ड काय असू शकते याचे नियम पुर्नलिखित करत आहोत. त्याचबरोबर उद्योगासाठी उत्कृष्टतेचे  नवीन मापदंड निश्चित करत आहोत आणि सर्वांसाठी बँकिंग‘ या आमच्या वचनबद्धतेला बळकट करत आहोत.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading