नेहरू तरुण मंडळ ट्रस्ट च्या श्रींची प्राणप्रतिष्ठा गौरी सावंत करणार
पुणे : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची तयारी पुण्यात व महाराष्ट्रात सुरू झालेली आहे तपकीर गल्ली मधील नेहरू तरुण मंडळ ट्रस्ट च्या श्रींची प्रतिष्ठापना यंदा तृतीयपंथी नेत्या गौरी सावंत यांच्या हस्ते संध्याकाळी ८.०० वाजता होणार असल्याचे ट्रस्ट चे मुख्य विश्वस्त पुष्कर तुळजापूरकर यांनी पत्रकाद्वारे कळवली आहे
हा सार्वजनिक उत्सव असल्याने आपण सर्व जण या संकल्पनेतून यंदा श्रींच्या प्रतिष्ठापने चा मान एका तृतीय पंथी व्यक्तीला द्यावा असा निर्णय ट्रस्ट च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतला गौरी सावंत यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा केली जाणार असल्याचे ही त्यांनी सांगितले