Saturday, June 13, 2026
Latest NewsSports

डॉ.प्रमोद मुळे स्मृती करंडक पुणे जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत नील मुळ्ये, आनंदिता लुनावत यांना विजेतेपद 

पुणे :  पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब आयोजित डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक पुणे जिल्हा अजिंक्‍यपद टेबल टेनिस स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलांच्या गटात नील मुळ्ये याने तर, मुलींच्या गटात आनंदिता लुनावत यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
पीवायसी क्‍लबच्या टेबल टेनिस हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत 19 वर्षांखालील मुलींच्या गटात दुसऱ्या मानांकित आनंदिता लुनावत हिने राधिका सकपाळचा 11-08, 11-04, 11-09, 10-12, 11-09 असा एकतर्फी पराभव करून विजेतेपद मिळविले. आनंदिता ही सुर्यदत्ता कॉलेज मध्ये अकरावी इयत्तेत विज्ञान शाखेत शिकत असून भुषण ठाकुर हाय परफॉर्मन्स सेंटर येथे प्रशिक्षक भुषण ठाकुर व आरती ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. याआधीच्या उपांत्य फेरीत राधिका सकपाळने चौथ्या मानांकित सई कुलकर्णीचा12-10, 11-07, 11-06 असा तर, दुसऱ्या मानांकित आनंदिता लुनावतने तिसऱ्या मानांकित नभा किरकोळेचा 11-08, 11-07, 11-05 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
मुलांच्या गटात अंतिम लढतीत पाचव्या मानांकित नील मुळ्येने इशान खांडेकरचा 11-09, 11-13, 11-07, 12-10, 11-08 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. नील हा डॉ.कलमाडी हायस्कूल मध्ये अकरावी ईयत्तेत वाणिज्य शाखेत शिकत असून डेक्कन जिमखाना येथे प्रशिक्षक उपेंद्र मुळ्ये यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
याआधीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाचव्या मानांकित नील मुळ्येने अव्वल मानांकित प्रणव घोळकरचा 07-11, 11-04, 11-09, 11-08 असा तर, बिगरमानांकित इशान खांडेकरने सातव्या मानांकित वेदांग जोशीचा 04-11, 11-09, 11-08, 11-07 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 19 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी
नील मुळ्ये(5)वि.वि.प्रणव घोळकर(1)07-11, 11-04, 11-09, 11-08;
इशान खांडेकर वि.वि.वेदांग जोशी(7)04-11, 11-09, 11-08, 11-07;
अंतिम फेरी: नील मुळ्ये(5)वि.वि.इशान खांडेकर 11-09, 11-13, 11-07, 12-10, 11-08
19 वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी:
राधिका सकपाळ वि.वि.सई कुलकर्णी(4)12-10, 11-07, 11-06
आनंदिता लुनावत (2) वि.वि.नभा किरकोळे (3) 11-08, 11-07, 11-05;
अंतिम फेरी: आनंदिता लुनावत (2) वि.वि.राधिका सकपाळ11-08, 11-04, 11-09, 10-12, 11-09
17 वर्षांखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी:
नील मुळ्ये(1)वि.वि.इशान खांडेकर 11-06, 07-11, 11-06, 11-08;
शौरेन सोमण(4)वि.वि.वेदांग जोशी(5) 08-11, 11-03, 11-06, 11-05;
प्रणव घोळकर(3)वि.वि.अश्विन कुमारगुरु(6) 11-09, 11-08, 11-06;
कौस्तुभ गिरगावकर(2)वि.वि.प्रणव खेडकर(7) 13-11, 11-09, 11-07
पुरुष : उपांत्यपूर्व फेरी:
ओंकार जोग(4)वि.वि.प्रणव घोळकर(5) 11-01, 07-11, 12-10, 11-09;
नील मुळ्ये(7)वि.वि.शौनक सानपूरकर 11-08, 11-06, 13-11;
आदित्य जोरी(1)वि.वि.रजत कदम 11-09, 09-11, 08-11, 11-06, 13-11;
भार्गव चक्रदेव(3)वि.वि.शुभंकर रानडे 11-09, 12-10, 09-11, 07-11, 11-07;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading