fbpx
Tuesday, October 3, 2023
BusinessLatest News

महिंद्रा लॉजिस्टिक्स आणि फ्लिपकार्टचा एकात्मिक लाईन हाऊल सोल्यूशन्ससाठी सहयोग

पुणे : भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक थर्ड पार्टी लॉजिस्टिक सेवा पुरवठादारांपैकी एक महिंद्रा लॉजिस्टिक लिमिटेडने आज एकात्मिक लाईन हाऊल सोल्यूशन्ससाठी फ्लिपकार्टसोबतच्या आपल्या सहकार्याची घोषणा केली. यामुळे कामकाजीय कार्यक्षमता आणि  सातत्य वाढेल तसेच नाविन्यपूर्णतेसाठी असलेल्या दोन्ही कंपन्यांच्या सामायिक बांधिलकीला अधिक मजबूती येईल.

महिंद्रा लॉजिस्टिक हेवी कमर्शिअल (जड व्यावसायिक) वाहनांचा एक समर्पित ताफा, मार्ग व्यवस्थापन आणि नेटवर्क ऑपरेशन्समध्ये सहाय्य आणि फ्लिपकार्टच्या भारतभरातील कामकाजासाठी प्रगत विश्लेषणे पुरवेल. महिंद्रा लॉजिस्टिक डेमलर इंडिया कमर्शिअल व्हेइकल्सच्या सहकार्याने फ्लिपकार्टसाठी ३२ फूट सिंगल एक्सल जड व्यावसायिक वाहने कार्यरत ठेवतील. ती देशभरातील अनेक राष्ट्रीय मार्गांवर वाहतूक करतील. सुरक्षिततेच्या बांधिलकीशी सुसंगत सर्व वाहनांमध्ये प्रगत अॅडव्हान्स ड्रायव्हर-असिस्टन्स सिस्टम (ADAS), आणि इतर विविध वाहन सुरक्षा तसेच ड्रायव्हर सुरक्षा आणि आरामाशी संबंधित प्रगत वैशिष्ट्ये असतील.

महिंद्रा लॉजिस्टिकद्वारे तैनात केलेला ताफा प्रामुख्याने फ्लिपकार्टच्या ई-कॉमर्स पार्सलची वाहतूक हब-टू-हब कामकाजाद्वारे सुलभ करेल. TAT मधील सुधारणा, उच्च सुरक्षा स्तर आणि फ्लीट व्यवस्थापन हे भारतीय ई-कॉमर्स उद्योगातील मानके उंचावण्यासाठी असलेली फ्लिपकार्टची वचनबद्धता अधोरेखित करतात.

या सहयोगावर भाष्य करताना व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रामप्रवीण स्वामिनाथन म्हणाले, “आम्हाला फ्लिपकार्टसोबत सहयोग करताना आणि संपूर्ण भारतभर हे समर्पित लाईन हाऊल ट्रान्स्पोर्टेशन सोल्यूशन्स पुरविण्यात आनंद होत आहे. हे उपाय फ्लिपकार्टसाठी आमच्या सध्याच्या लाईन हॉल योजनांचा विस्तार करतात आणि त्यायोगे त्यांच्या कामकाजाची एकूण किंमत कमी करण्यासाठी आणि सेवा सुधारण्यासाठी त्यांना सक्षम करतात. आमचे सुधारित फ्लीट मॅनेजमेंट स्टँडर्ड्स ड्रायव्हर स्वास्थ्य आणि विविधतेवर लक्ष केंद्रित करून, कामकाज गुणवत्तेची उच्च मानके प्रदान करण्यासाठी सेवा देतील.”

फ्लिपकार्टने आपल्या लाईन हाऊल ऑपरेशन्सची कार्यक्षमता आणि सातत्य वाढवण्यासाठी एक परिवर्तनीय प्रवास सुरू केला आहे. महिंद्र लॉजिस्टिक्ससोबतच्या या सहकार्यामुळे कंपनीच्या एकात्मिक लॉजिस्टिकमधील क्षमतांना लाभ मिळायला मदत होईल.

या सहयोगाविषयी बोलताना फ्लिपकार्ट समूहाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि पुरवठा साखळी, ग्राहक अनुभव आणि रीकॉमर्स विभागाचे प्रमुख हेमंत बद्री म्हणाले, “भारतातील स्वदेशी ई-कॉमर्स मार्केटप्लेस म्हणून आम्हाला नेहमीच असे वाटत आले आहे की आमच्या सगळ्या कृती निव्वळ कामकाजीय उत्कृष्टतेच्या पलीकडे जाणाऱ्या असाव्यात आणि भारतातील मोठ्या पुरवठा साखळी आणि दळणवळण परिसंस्थेला त्यांचा फायदा व्हावा. महिंद्र लॉजिस्टिकसोबतचे हे सहकार्य आमच्या लांब पल्ल्याच्या कामकाजामध्ये वर्धित विश्वासार्हता आणि कार्यक्षमता वाढविण्यात मदत करेल. त्यांचे समर्पित फ्लीट व्यवस्थापन, तज्ञ मार्ग व्यवस्थापन आणि प्रगत विश्लेषणे लोड एकत्रीकरणाचा एक इष्टतम मार्ग सक्षम करेल, कार्यक्षम, जलद आणि शाश्वत वितरण सक्षम करत मार्ग नियोजन करेल.”

कनेक्टेड वाहन तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण महिंद्रा लॉजिस्टिक कंट्रोल टॉवरला फ्लीटच्या कार्यक्षमतेवर लक्ष ठेवण्यासाठी सक्षम करते. ही सुविधा कामकाजाचा एकूण खर्च कमी करत वेळ आणि सेवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते.

Leave a Reply

%d bloggers like this: