fbpx
Thursday, December 7, 2023
BusinessLatest News

आयनॉक्स इंडिया लिमिटेडने सेबीकडे डीआरएचपी सादर केले

आयनॉक्ससीव्हीए या प्रतिष्ठित ब्रँडची प्रमोटर कंपनी, आयनॉक्स इंडिया लिमिटेड या इंडस्ट्रियल गॅसेस क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे आपले ड्राफ्ट रेड हेरिंग प्रोस्पेक्टस सादर केले आहे.

समभाग विक्री करू इच्छिणारे प्रमोटर आणि इतर समभागधारकांकडून २,२१,१०,९५५ पर्यंत इक्विटी समभागांच्या विक्रीसाठी आयपीओमार्फत भांडवल उभारणी करण्याची कंपनीची योजना आहे.

क्रायोजेनिक स्थितींसाठी इक्विपमेंट्स आणि सिस्टिम्सचे डिझाईन, इंजिनीयरिंग, उत्पादन आणि इन्स्टॉलेशन करण्याचा ३० वर्षांपेक्षा जास्त अनुभव गाठीशी असलेल्या या कंपनीने क्रायोजेनिक इक्विपमेंट उद्योगक्षेत्रात आयनॉक्ससीव्हीए हा प्रतिष्ठित ब्रँड विकसित केला आहे.

विक्रीसाठीच्या ऑफरमध्ये सिद्धार्थ जैन यांच्याकडून १,०४,३७,३५५ पर्यंत; पवन कुमार जैन यांच्याकडून ५०,००,००० पर्यंत; नयनतारा जैन यांच्याकडून ५०,००,००० पर्यंत; इशिता जैन यांच्याकडून १२,००,००० पर्यंत (प्रमोटर समभागधारक), मंजू जैन यांच्याकडून २,३०,००० पर्यंत; लता रुंगटा यांच्याकडून १,९०,००० पर्यंत; भारती शाह यांच्याकडून १३,४०० पर्यंत; कुमुद गंगवाल यांच्याकडून १३,४०० पर्यंत; सुमन अजमेरा यांच्याकडून १३,४०० पर्यंत; रजनी मोहत्ता यांच्याकडून १३,४०० पर्यंत

(इतर समभागधारक) इक्विटी समभागांचा समावेश आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड आणि ऍक्सिस कॅपिटल लिमिटेड हे या आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमार्फत विक्रीसाठी प्रस्तुत केले जात असलेले इक्विटी समभाग बीएसई आणि एनएसईमध्ये सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत.

या कंपनीच्या उत्पादनांमध्ये स्टॅन्डर्ड क्रायोजेनिक टँक्स आणि इक्विपमेंट, बेव्हरेज केग्स, बिस्पोक टेक्नॉलॉजी, इक्विपमेंट आणि सोल्युशन्स तसेच मोठ्या टर्नकी प्रकल्पांचा समावेश आहे.  इंडस्ट्रियल गॅसेस, लिक्विफाईड नॅचरल गॅस, ग्रीन हायड्रोजन, ऊर्जा, स्टील, वैद्यकीय आणि आरोग्य देखभाल, रसायने व खते, एव्हिएशन आणि एरोस्पेस, फार्मास्युटिकल्स आणि बांधकाम अशा विविध उद्योगक्षेत्रांमध्ये त्यांचा वापर केला जातो. याशिवाय ही कंपनी जागतिक पातळीवरील वैज्ञानिक संशोधन प्रकल्पामध्ये वापरल्या जाणाऱ्या क्रायोजेनिक इक्विपमेंटची रेन्ज तयार करते. २०२२ आर्थिक वर्षातील महसूलानुसार ही कंपनी भारतातून क्रायोजेनिक टँक्सची सर्वात मोठी निर्यातक होती.

Leave a Reply

%d