fbpx
Tuesday, September 26, 2023
Latest NewsSports

एकदंत क्रिकेट क्लब, बिझनेस प्रोफेशनल्स् क्लब संघांची विजयी कामगिरी; एलके इलेव्हनचा विजयांचा षटकार !!

पुणे : एजीएएस मॅनेजमेंट तर्फे कै. अपर्णा चंद्रशेखर ओक यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित तिसर्‍या ‘मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत एलके इलेव्हन संघाने सलग सहावा विजय तर, एकदंत क्रिकेट क्लब आणि बिझनेस प्रोफेशनल्स् क्लब या संघांनी प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.

मुकूंदनगर येथील कटारीया हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या सामन्यात क्षितीज आपटे याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर बिझनेस प्रोफेशनल्स् क्लबने जॅग्वॉर्स क्रिकेट क्लबचा ८ गडी राखून पराभव करत तिसरा विजय नोंदविला. पहिल्यांदा फलंदाजी करताना जॅग्वॉर्स क्रिकेट क्लबचा डाव १०९ धावांवर मर्यादित राहीला. अक्षय शिंदे याने ५० धावांची खेळी केली. क्षितीज आपटे याने १३ धावत ३ गडी टिपले. अमित उमरीकर याने २६ धावात २ गडी बाद केले. बिझनेस प्रोफेशनल्स् क्लबने १० षटकात व २ गडी गमावून सहज लक्ष्य पार केले. गिरीष कोंडे (नाबाद ४७ धावा), अभिषेक खंबाटे (२६ धावा) आणि हर्षद तिडके (नाबाद १९ धावा) यांनी संघाचा विजय सोपा केला.

कपिल गुप्ता याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर एलके इलेव्हन संघाने आयोध्या वॉरीयर्स संघाचा १०९ धावांनी सहज पराभव करून सलग सहावा विजय मिळवला. नचिकेत कुलकर्णी (५४ धावा) आणि समीर पंचपोर (४९ धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर एलके इलेव्हनने १९९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. कपिल गुप्ता याने १३ धावात ४ गडी बाद करून आयोध्या वॉरीयर्स संघाच्या डावाला खिंडार पाडले. आयोध्या वॉरीयर्सचा डाव ९० धावांवर गडगडला. एलके संघाच्या विशाल गुप्ता आणि वैभव ललवाणी यांनीही दुसर्‍या बाजून अचूक गोलंदाजी करून संघाला सहज विजय मिळवून दिला.

आनंद एन. याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर एकदंत क्रिकेट क्लबने ट्रोजन्स् क्रिकेट क्लबचा ३८ धावांनी पराभव करून चौथा विजय मिळवला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
जॅग्वॉर्स क्रिकेट क्लबः २० षटकात ९ गडी बाद १०९ धावा (अक्षय शिंदे ५० (३७, २ चौकार, ४ षटकार), हर्षद वैद्य ३७, क्षितीज आपटे ३-१३, अमित उमरीकर २-२६) पराभूत वि. बिझनेस प्रोफेशनल्स् क्लबः १० षटकात २ गडी बाद ११० धावा (गिरीष कोंडे नाबाद ४७, अभिषेक खंबाटे २६, हर्षद तिडके नाबाद १९); सामनावीरः क्षितीज आपटे;

एकदंत क्रिकेट क्लबः २० षटकात ७ गडी बाद १४० धावा (अमोल नाजन २३, अमोल लहासे ५१ (२६, ४ चौकार, ४ षटकार), आकाश पुरोहीत २-१९, गौरव उपाध्याय २-२१) वि.वि. ट्रोजन्स् क्रिकेट क्लबः १९ षटकात १० गडी बाद १०२ धावा (रोहीत सिंग ४३, सुधीर चौधरी १२, आनंद एन. ३-१३, सुदर्शन गुणे २-२२); सामनावीरः आनंद एन.;

एलके इलेव्हनः २० षटकात ७ गडी बाद १९९ धावा (नचिकेत कुलकर्णी ५४ (२३, ७ चौकार, ३ षटकार), समीर पंचपोर ४९, अमित उमरीकर २-३२) वि.वि. आयोध्या वॉरीयर्सः १६.३ षटकात १० गडी बाद ९० धावा (अमित फाटक २४, अमित उमरीकर १७, आदित्य पाळंदे १३, कपिल गुप्ता ४-१३, विशाल गुप्ता ३-१०, वैभव ललवाणी ३-२३); सामनावीरः कपिल गुप्ता.

Leave a Reply

%d bloggers like this: