fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsPUNE

पिंपरी चिंचवड शहरातील समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा होणार सन्मान

पिंपरी : पुणे व पिंपरी चिंचवड शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या शमीम हुसेन फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान मेट्रो सिटी आयकॉन 2023 पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे .

संस्थेच्या वतीने मेट्रो सिटी आयकॉन 2023 पुरस्कार या वर्षापासून सुरू करण्यात येत आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरात पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या शबनम न्यूज मीडिया ग्रुप या वृत्तसंस्थेचा सातवा वर्धापन दिन साजरा होत आहे या वर्धापन दिनाचे औचित्य साधत समाजातील अनेक घटकांना ज्या समाजसेवकांच्या वतीने लाभ मिळाला आहे तसेच आपल्या शहरात ज्या व्यक्तींच्या कार्याने समाजाची उन्नती होण्यास तसेच समाजाचा विकास होण्यास चालना मिळाली आहे अशा व्यक्तींचा सन्मान मेट्रो सिटी आयकॉन 2023 पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे .

या पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष आहे या पहिल्या वर्षात पिंपरी चिंचवड शहरातील 13 व्यक्तींचा मेट्रो सिटी आयकॉन पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत आहे. सदर पुरस्कार सोहळा हा 9 सप्टेंबर रोजी शनिवारी सायंकाळी सहा ते नऊ या कालावधीत ऑटो क्लस्टर सभागृह, चिंचवड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे अशी माहिती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष तथा शबनम न्यूज वृत्त संस्थेच्या संपादिका शबनम सय्यद यांनी दिली आहे.

मेट्रो सिटी आयकॉन 2023 पुरस्काराने सन्मानित होणारे व्यक्ती हे पिंपरी चिंचवड शहरात अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य अग्रेसर आहेत त्यांच्या कार्यामुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक सामाजिक बदल घडले आहेत या सामाजिक बदलामुळे समाजातील अनेक वंचित घटकांना त्याचा लाभ मिळाला या मेट्रो सिटी आयकॉन 2023 पुरस्कार मिळविणाऱ्या सन्मानित व्यक्तींची नावे जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील माजी नगरसेविका प्रियंका प्रवीण बारसे, माजी नगरसेविका मनीषा प्रमोद पवार, सखी महिलाबचत गट च्या अध्यक्ष तथा माळी महासंघ महिला आघाडी च्या उपाध्यक्ष रुपाली प्रदीप आहेर माजी नगरसेवक राहुल हनुमंतराव भोसले, सरपंच फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष देविदास गुलाबराव तांबे, वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर मनीषा सुमंत गरुड, काँग्रेस पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहरातील महिला अध्यक्ष सायली किरण नढे,अखिल थेरगाव युवा मंचच्या अध्यक्ष करिश्मा सनी बारणे, साधना इंग्लिश मीडियम स्कूलच्या संस्थापक अध्यक्ष साधना नेताजी काशीद, अधिरा स्कूलचे संस्थापक नवनाथ ढवळे, नारीशक्ती महिला मंचच्या अध्यक्षा, समाजसेविका तथा उद्योजिका नीलिमा विश्वनाथ उर्फ मनोज जरे, सांगवी परिसरातील शितोळे विद्यालयाचे आदर्श शिक्षक शिवाजी माने, टाटा मोटर्सचे आदर्श कामगार सोमनाथ दगडू कोरे व देवकर दत्तात्रय आनंदा या थोर व्यक्तींचा सन्मान मेट्रो सिटी आयकॉन 2023 पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे.

सदर पुरस्कार सोहळा हा मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात येणार आहे या कार्यक्रमाला बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सौ सुप्रियाताई सुळे,मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप, पिंपरी विधानसभा मतदार संघाचे आमदार अण्णासाहेब बनसोडे, विधान परिषदेच्या सदस्य आमदार उमाताई खापरे, प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल ,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर या सन्मानित व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती शबनम सय्यद यांनी दिली आहे.

Leave a Reply

%d