fbpx
Saturday, September 30, 2023
ENTERTAINMENTLatest News

 बिग बी आणि डॉन 17 वर्षांनी एकत्र स्क्रीन शेयर करणार. 

 बॉलीवूडचा विचार केला तर कोणाच्याही मनात प्रथम नाव येते ते म्हणजे अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान. या दोन सुपरस्टार्स ने बॉलीवूडवर राज्य करत आजवर प्रेक्षकांच मनोरंजन केलं आहे. संपूर्ण देश या दोघांना पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे.
 एका अंतर्गत सूत्रानुसार ” या अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. तब्बल 17 वर्षांनी हे दोघं सोबत येऊन काहीतरी अफलातून मनोरंजक प्रोजेक्ट करणार आहे. या बद्दल काही बातम्या अद्याप बाहेर आलेल्या नाहीत परंतु लवकरच या बद्दल चे तपशील समोर येतील अस समजतंय”
 मनोरंजन क्षेत्रासाठी ही सर्वात मोठी बातमी आहे. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या दोघांनी यापूर्वी मोहब्बतें, कभी खुशी कभी गम आणि कभी अलविदा ना कहना यांसारख्या सुपरहिट चित्रपटातून प्रेक्षकांना मोहित केलं आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनोरंजन करण्यासाठी हे दोघे सज्ज आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: