होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियातर्फे २०२३ हॉर्नेट २.० लाँच
नवी दिल्ली – होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (एचएमएसआय) आज ओबीडी२ नियमानुसार २०२३ हॉर्नेट २.० लाँच केली. इंटरनॅशनल स्ट्रीट फायटर म्हणून तयार केलेल्या, अद्ययावत नव्या हॉर्नेट २.० ओबीडी२ मध्ये होंडाच्या रेसिंग गुणधर्माचे स्ट्रीट रायडिंगच्या थरारात रुपांतर करण्यात आले आहे. त्याची किंमत रू. १,३९,००० (एक्स शोरूम दिल्ली) आहे.
होंडाच्या या नव्या उत्पादनाविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी त्सुत्सुमु ओतानी म्हणाले, ‘एचएसएमआय सरकारच्या अद्ययावत नियमानुसार उत्पादन श्रेणी अद्ययावत करण्यासाठी झटत आहे. आजचा दिवस आमच्यासाठी लक्षणीय आहे, कारण आज आम्ही ओबीडी२ नियमानुसार तयार करण्यात आलेली २०२३ हॉर्नेट २.० लाँच केली आहे. २०२० मध्ये पहिल्यांदा लाँच केल्यापासून हॉर्नेट २.० ला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि आम्हाला खात्री आहे, की नव्या गाडीमुळे हॉर्नेटचे बाजारपेठेतील स्थान आणखी बळकट होईल.’
२०२३ हॉर्नेट २.० लाँचविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक योगेश माथुर म्हणाले, ‘नव्या युगातील ग्राहकांच्या स्वप्नांनी व मोटरसायकल रायडिंगबद्दल त्यांना वाटणाऱ्या पॅशनने प्रेरित होऊन तयार करण्यात आलेली नवी हॉर्नेट २.० लाँच करताना आम्हाला आनंद होत आहे. या मोटरसायकलमध्ये आम्ही होंडाच्या रेसिंग गुणधर्माचे स्ट्रीट रायडिंगसाठी आवश्यक वैशिष्ट्यात रुपांतर केले आहे. आधुनिक वैशिष्ट्ये आणि थरारक कामगिरी यांच्या जोरावर हॉर्नेट २.० स्ट्रीट फायटर वाऱ्यावर स्वार होऊ इच्छिणाऱ्या तरुण मोटरसायकल प्रेमींसाठी अगदी योग्य आहे.’
ठळक, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टायलिंग
नव्या २०२३ हॉर्नेट २.० मध्ये आक्रमक डिझाइन आणि अत्याधुनिक ग्राफिक्स यांचा मेळ घालण्यात आला आहे. पुढे झुकणारे एयरोडायनॅमिक स्टायलिंग आणि इंधनाची मोठी टाकी यामुळे गाडी आणखी दणकट दिसते.
स्टायलिंगला पूर्णपणे एलईडी लायटिंग सिस्टीमची (एलईडी हेडलॅम्प, एलईडी विंकर्स आणि एक्स शेप्ड एलईडी टेल लॅम्प) जोड देण्यात आल्यामुळे दृश्यमानता आणि विश्वासार्हता वाढली आहे. स्पोर्टी स्पिल्ट सीट आणि की ऑन टँक प्लेसमेंटमुळे गाडीचे स्ट्रीट फायटर वैशिष्ट्य उठावदार झाले असून रायडरची जास्त सोय झाली आहे.
हॉर्नेट २.० चे प्रीमियम व स्पोर्टी स्वरुप शॉर्ट मफलर आणि टेन स्पोक अलॉय व्हील डिझाइनमुळे ठळक झाले आहे, तर अल्युमिनियम फिनिश्ड फुट पेग्जमुळे एकंदर स्टाइल उंचावली आहे.
आधुनिक तंत्रज्ञान
नव्या २०२३ हॉर्नेट २.० मध्ये ताकदवान १८४.४० सीसी, ४ स्ट्रोक, सिंगल- सिलेंडर बीएसव्हीआय ओबीडी२ चे पालन करणारे पीजीएम- एफआय इंजिन बसवण्यात आले आहे. हे इंजिन आधीपेक्षा जास्त पर्यावरणपूरक आहे. ओबीडी२ हॉर्नेट २.० मध्ये विविध सेन्सर्स आणि मॉनिटर्स घटक बसवण्यात आले आहेत, जे उत्सर्जनाच्या कामगिरीवर परिणाम करतात. जर कोणत्याही प्रकारचा बिघाड झालेला असेल, तर गाडीच्या इन्स्ट्रुमेंटल पॅनेलवर वॉर्निंग लाइट प्रकाशमान होतो.
होंडाच्या नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांवर विश्वास दर्शवणाऱ्या ग्राहकांसाठी अद्ययावत २०२३ हॉर्नेट २.० मध्ये नवीन असिस्ट आणि स्लिपर क्लच बसवण्यात आला आहे, ज्यामुळे डेक्लरेशनच्या वेळेस अपशिफ्ट सोपे होते व हार्ड डाउन शिफ्ट्सवरील रियर व्हील लॉक अपचे योग्य व्यवस्थापन होते आणि रायडरची सुरक्षितता वाढते.
हॉर्नेट २.० मध्ये गोल्डन अप- साइड डाउन (युएसडी) फ्रंट फोर्क – सब-२०० सीसी मोटरसायकल क्षेत्रात पहिल्यांदाच देण्यात आला आहे. यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान व दर्जेदार अपील यांचा मिलाफ साधण्यात आला असून त्यामुळे इंटरनॅशनल स्ट्रीट फायटर स्टाइलची ही गाडी हाताळणं सोपं झालं आहे.
आधुनिक पूर्णपणे डिजिटल लिक्विड क्रिस्टल इन्स्ट्रुमेंट पॅनेलवर स्पीडोमीटर, ओडोमीटर, टॅकोमीटर, बॅटरी वॉल्टमीटर, ट्विन ट्रिप मीटर्स, गियर पोझिशन इंडिकेटर, सर्व्हिस ड्यू इंडिकेटर आणि घड्याळ यांचा समावेश आहे. यामध्ये कस्टमाइजेबल ब्राइटनेस (५ लेवल्सपर्यंत आपल्या सोयीनुसार कमी- जास्त करता येण्यासारखा) देण्यात आला असून त्यामुळे दिवसा/रात्रीची दृश्यमानता उंचावते.
रस्त्यावर चांगले नियंत्रण मिळावे यासाठी हॉर्नेट २.० मध्ये ड्युएल, पेटल डिस्क ब्रेक्स सिंगल चॅनेल एबीएएससह देण्यात आले आहेत. मोने शॉक रियर सस्पेन्शनमुळे गुरुत्वाकर्षणाचा केंद्रबिंदू राखण्यास मदत होते व रायडिंगच्या दर्जेदार अनुभवासाठी तसेच कॉर्नरिंग करताना चांगले स्थैर्य मिळते.
रायडिंग पोश्चर तणावमुक्त राहावे यासाठी यात चांगली कामगिरी व आरामदायीपणाचा मेळ घालण्यात आला आहे. हॉर्नेट २.० चे विस्तृत ट्युबलेस टायर्स (११०एमएम फ्रंट आणि १४० एमएम रियर) रायडरचा आत्मविश्वास वाढवतात, तर इंजिन स्टॉप स्विच, हजार्ड लाइट्स, साइड स्टँड इंडिकेटर आणि सील्ड चेन यामुळे आरामदायीपणा वाढतो.
थरारक कामगिरी
२०२३ हॉर्नेट २.० केवळ शहरी ट्रॅफिकमध्येच नाही, तर आपल्या थरारक कामगिरीने हायवे राइडचा अनुभवही उंचावते. यातील नवीन १८४.४० सीसी, ४ स्ट्रोक, सिंगल सिलेंडर बीएसव्हीआय ओबीडी२ चे पालन करणारे इंजिन १२.७० केडब्ल्यू उर्जा आणि १५.९ एनएम पीक टॉर्क देते.
उच्च इंधन कार्यक्षमतेबरोबरच आकर्षक अनुभव देणाऱ्या हॉर्नेट २.० मध्ये दमदार अक्सलेरशन व सर्व प्रकारच्या रायडिंग परिस्थितीमध्ये इनटेक आणि एकझॉस्ट घटकांच्या माध्यमातून वेगवान प्रतिसाद मिळतो. याचे एयरोडायनॅमिक डिझाइन हाताळणी सफाईदार करते व उच्च वेग असतानाही चांगले स्थैर्य देते.
खास मूल्य
नव्या २०२३ हॉर्नेट २.० ओबीडी२ ची किंमत रू १,३९,००० (एक्स शोरूम दिल्ली आहे). एचएमएसआयतर्फे १० वर्षांचे वॉरंटी पॅकेज (३ वर्ष स्टँडर्ड + ७ वर्ष पर्यायी) या मोटरसायकलवर देण्यात येणार आहे.
व्हेरिएंट | हॉर्नेट २.० ओबीडी२ डबल डिस्क |
किंमत (एक्स शोरूम दिल्ली) | रू. १,३९,००० |
रंगांचे पर्याय | पर्ल इग्नियस ब्लॅक, मॅट सांगरिया रेड, मेटॅलिक, मॅट मार्वल ब्लू मेटॅलिक आणि मॅट अक्सिस ग्रे मेटॅलिक |