Sunday, October 18, 2026

Day: August 27, 2023

Latest NewsPUNE

पुणे हे निसर्गोपचाराचे विद्यापीठ – चंद्रकांत पाटील

पुणे : पुणे हे निसर्गोपचाराचे विद्यापीठ झाले असून येथे विविध थेरपींच्या माध्यमातून नागरिकांच्या व्याधी दूर करण्याचे मोठे कार्य चालते असे

Read More
Latest NewsPUNE

संयुक्त जयंती सोहळ्यानिमित्त मातंग साहित्य परिषदेतर्फे ‌‘जागर महापुरुषांच्या विचारांचा’

पुणे : साम्राज्यशाही वृत्तीतून मुक्त होणे ही लोकमान्य टिळक यांची भूमिका होती. ज्या मूल्यांचे जागरण लोकमान्यांनी केले त्यांची धुरा अण्णा भाऊ साठे यांनी पुढे वाहिली. आगरकर कर्ते सुधारक होते. ते अज्ञेयवादी होते. अण्णा भाऊ साठे यांनी सर्वांना जोडणारी–एकत्र नेणारी, वेदनेचे उदात्तीकरण न करणारी साहित्य मांडणी केली असल्याने ते संपूर्ण राष्ट्राचे साहित्यिक आहेत. टिळक, आगारकर आणि साठे यांच्यातील मानवतावाद हा धागा समान आहे. या महापुरुषांच्या सामर्थ्याची बेरीज जातीयवादा पलिकडे जाऊन करणे आवश्यक आहे, अशा शब्दांत महनिय वक्त्यांनी महापुरुषांच्या विचारांचा जागर केला. मातंग साहित्य परिषदेतर्फे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, आद्य समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर आणि साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या संयुक्त जयंती सोहळ्यानिमित्त ‌‘जागर महापुरुषांच्या विचारांचा‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. श्यामा घोणसे, विवेक मासिकाचे सहसंपादक रवींद्र गोळे, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अभय टिळक हे प्रमुख वक्ते होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकवादी विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस होते. मातंग साहित्य परिषदेचे संस्थापकअध्यक्ष डॉ. धनंजय भिसे, संपत जाधव, संदिपान झोंबाडे, भाऊसाहेब अडागळे, डॉ. आंबादास सकट, विसाजी लांडगे  व्यासपीठावर होते. भारतीय विचार साधना सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, टिळकांनी केवळ उच्चभ्रू जातीचे राजकारण केले नाही तर त्यांना तेल्या तांबोळ्यांचेही पुढारी समजले जात असे. यामुळे टिळकांना बहुजनांचा पाठींबा मिळाला आणि ते राष्ट्रीय स्तरावर पोहाचले. परंतु ते परंपरावादी होते. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व दबले गेले. आगारकरांचा सुधारणावादही ठराविक जाती–धर्मापुरता नव्हता. त्यांनी बुद्धिप्रामाण्यवादाचा पुरस्कार केला. अण्णा भाऊ साठे हे विश्वात्मक आहेत. त्यांनी सर्व तऱ्हेच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. शोषणाचा, साम्राज्यवादाचा विरोध केला. महापुरुष कोणा एका जातीचे, देशाचे नसतात तर ते मानवतेचे उद्धारक असतात. डॉ. अभय टिळक म्हणाले, टिळक आगरकर यांच्या विचारांमधील समानसूत्र मुक्तीचे आहे. विस्तारवादी साम्राज्यशाहीला टिळक यांचा विरोध होता. टिळक, आगरकर आणि अण्णा भाऊ या तिघांच्या संपूर्ण विचारविश्वाचा केंद्रबिंदू म्हणजे स्वायत्त, जबाबदार माणूस घडताना सर्व प्रकारची मुक्ती हा आहे. डॉ. श्यामा घोणसे म्हणाल्या, टिळक–आगरकर यांचे विचार हा पुरोगामी महाराष्ट्राचा पाया आहे. विचारकलहाला भिऊ नका, हे मत आगरकर यांनी मांडले. मतभेद, विचारभेद असले तरी चालतील पण मनभेद झाल्यास राष्ट्रीयत्वाला धोका निर्माण होतो, अशी आगरकर यांची भावना होती. आधी केले मग सांगितले असे टिळक–आगरकर आणि अण्णा भाऊ यांचे विचार होते. रवींद्र गोळे म्हणाले, समाजातील एकत्वाची भावना अण्णा भाऊंच्या साहित्यात दिसते. त्यांनी आपल्या साहित्यात स्त्रीचे शील, पुरुषाचा स्वाभीमान आणि राष्ट्राचे स्वातंत्र्य या विषयी कधीही तडजोड केली नाही. समाजाला जोडणारे विचार हा त्यांच्या लिखाणाचा आत्मा होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. धनंजय भिसे यांनी केले. स्वागत संपत जाधव यांनी तर आभार डॉ. आंबादास सकट यांनी मानले.

Read More
Latest NewsPUNE

निष्कलंक राहा; भ्रष्टाचाराला बळी पडू नका : प्रवीण दीक्षित

पुणे : कर्तव्य बजावताना निष्कलंक राहा, भ्रष्टाचाराला बळी पडू नका; मोह टाळा, समाजाप्रती संवेदनशीलता अंगी बाळगा, असा कानमंत्र माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी नवोदित पोलीस उपनिरीक्षकांना दिला. श्री मुकुंद भवन ट्रस्ट आणि विवेक व्यासपीठ संचलित स्पार्क अकॅडमीतर्फे पीएसआय परीक्षेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. स्पार्क अकॅडमी, श्री मुकुंद भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माहेश्वरी राम मंदिर ट्रस्टचे शरद सारडा, श्री मुकुंद भवन ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त पुरुषोत्तम लोहिया, स्पार्क अकॅडमीचे संचालक स्वागत दरक व्यासपीठावर होते. आर्थिक–सामाजिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस योग्य दिशा देण्याच्या हेतूने अकॅडमीतर्फे मार्गदर्शन केले जाते. तुळसाबाई केंद्रे, अमृता बाठे, रोहित जाधव, भिमेश कोटला, मयूर डोंगरे, सागर सरोदे, मयूर गाडे, निखिल कोरपड, विक्रांत तळोले, अक्षय अडवाल, माधव गर्जे, तुषार चव्हाण, श्रीपाद गायकवाड या स्पार्क अकॅडमीच्या मुलाखत बॅचच्या 13 विद्यार्थ्यांची पीएसआयपदी निवड झाली आहे. प्रदीर्घ सेवेतील अनुभवांची शिदोरी रिती करताना दीक्षित पुढे म्हणाले, कार्यकाळात प्रत्येक तपासाचे डिजिटल रेकॉर्ड ठेवणे, वरिष्ठांशी त्याविषयी सल्लामसलत करणे, प्रशिक्षण काळात न समजलेले विषय नेटाने समूजन घेणे, अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करून त्याचा वापर करणे आवश्यक आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. त्याची उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे. लोकसंपर्क वाढविणे, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे जागरुकतेने–सतर्कतेने अवलोकन करणे ही काळाची गरज आहे. याच प्रमाणे राष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय घडमोडींविषयी अवगत असणे आवश्यक आहे. पोलिसी सेवेत स्त्री–पुरुष असा भेदाभेद नसल्याने गैरसोयी असल्या तरी त्यातून नेटाने मार्गक्रमण करावे. सेवेतील संधी नाकारू नका. कुटुंबिय आणि समाजाने पडत्या काळात केलेली मदत कधीही विसरू नका असा सल्लाही त्यांनी दिला. अधिकारी हे समाजाचे प्रतिनिधीत्व करतात ही मानसिकता ठेवून कार्यक्रमण करीत राहा असे पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर यांनी सांगितले. यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी यशाची वाटचाल कशा पद्धतीने केली याविषयी मनोगत व्यक्त केले. स्वागत दरक यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य समन्वयक मनिषा नरडेकर यांनी केले. आभार समन्वयक श्यामसुंदर कदम यांनी मानले.

Read More
ENTERTAINMENTLatest News

 आखरी सच मधील तमन्ना भाटियाच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना केलं मंत्रमुग्ध 

 तमन्ना भाटिया ने रॉबी ग्रेवालच्या ‘आखरी सच’ मध्ये लेडी कॉप म्हणून पदार्पण केलं आहे. आता डिस्ने+हॉटस्टारवर आलेल्या आखरी सच मध्ये

Read More
Latest NewsPUNE

विनोदबुद्धी राहिली नसल्याने सध्या व्यंगात्मक विनोदच शक्य – श्रावण हर्डीकर यांचे प्रतिपादन

पुणे : विनोद करण्याचे सध्या युग राहिलेले नाही. विनोद शेवटची घटका मोजत आहे असेही बोलले जात आहे. या परिस्थितीला सर्वच घटक जबाबदार आहेत. विनोदाचा आनंद घेण्याआधी तो पचविण्याची क्षमता समाजामध्ये निर्माण व्हावी लागते. विनोदवृत्ती राजकीय होते त्यावेळी राजकीय दृष्टीकोनातून दबाव यायला सुरुवात होते. स्वत:कडे विनोदबुद्धीने पाहण्याची क्षमता शिल्लक राहिलेली नसल्याने सध्या केवळ व्यंगात्मक विनोद करणेच शक्य आहे, अशी वास्तव परिस्थिती नागपूर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर (भाप्रसे) यांनी परखड शब्दात मांडली. डॉ. रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी लिखित ‌‘फुकटचेच सल्ले‘ या पुस्तकाचे प्रकाशन हर्डीकर यांच्या हस्ते आज (दि. 26) झाले. त्या वेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, समीक्षक प्रा. रणधीर शिंदे, मनोविकास प्रकाशनचे संचालक अरविंद पाटकर व्यासपीठावर होते. कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. हर्डीकर पुढे म्हणाले, विनोद हा कोणा एकावर नसून तो आपल्यातील आत्मवृत्तीवर असतो. विनोदवृत्ती प्रत्येकामध्ये दडलेली असते. खुमासदार विनोदशैली आपल्याला जर जपायची असेल तर आपल्यासारख्या वाचकाला आत्मावलोकन करीत विनोद स्वीकारणे तसेच वृत्तीत खुलेपणा आणणे फार आवश्यक आहे. डॉ. तांबोळी यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या माध्यमातून अनेक आनंददायी क्षण अनुभवायला मिळत असल्याचे हर्डीकर यांनी आवर्जून नमूद केले. प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, विनोद या प्रकाराकडे कधी गांभीर्याने न बघितल्याने त्याची अपरिमित हानी झाली आहे. अर्थ, धर्म, कामशास्त्रावर स्वतंत्र ग्रंथ आहेत पण हास्यशास्त्रावरचा एकही ग्रंथ आपल्याकडे नाही. नदीसारखा विनोदाचा प्रवाह आपल्याकडे नाही. आपल्याकडे शांतरस आहे, करूण, वीररस आहे; पण हास्यरसाचा मात्र अभाव दिसतो. मराठीतील विनोद आज अतिदक्षता विभागात आहे ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावी लागणार आहे. आजचा काळ विनोदी लेखनासाठी पूरक आहे. गेल्या शंभर वर्षांत जेवढी स्थित्यंतरे झाली नाहीत तेवढी गेल्या दहा वर्षांत झाली आहेत. जगणे आपल्यावर कोसळत आहे. अशा परिस्थितीमध्ये विनोदी लेखनासाठी खूप मोठी संधी आहे. पण समाजाची एकूण मानसिकता बघता विनोदबुद्धी क्षीण होणे आणि हास्य लोपणे हे समाजाच्या सांस्कृतिक अधोगतीचे लक्षण मानावे लागेल. आभासी जगात श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची चढाओढ लागलेली असताना डॉ. तांबोळी यांनी विविध कथांची मांडणी उत्तम प्रकारे केली असल्याचे प्रा. जोशी यांनी नमूद केले. प्रा. रणधीर शिंदे म्हणाले, विनोद या साहित्य प्रकाराकडे मूल्यांच्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. मात्र विनोदाकडे विडंबन या दृष्टीकोनातून पाहिले गेले. तांबोळी यांनी आपल्या लिखाणातून समाजातील अनेक बारकावे मांडले आहेत. तांबोळी यांच्या पुस्तकातील विविध कथांचा आधार घेऊन त्यांच्या नर्मविनोदी लेखन शैलीवर मार्मिक भाषेत प्रा. शिंदे यांनी टिप्पणी केली. सुरुवातीस डॉ. तांबोळी यांनी गोतावळ्यातून लेखन प्रवास कसा झाला हे सांगितले. प्रास्ताविक अरविंद पाटकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ कवी उद्धव कानडे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत अरविंद पाटकर आणि भूषण कदम यांनी केले. चित्रकार गिरीश सहस्त्रबुद्धे यांचा सत्कार प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. पुस्तकातील ‌‘वाढलेल्या पोटाची काळजी‘ या लेखातील काही भागाचे वाचन पत्रकार विशाल परदेशी यांनी केले.

Read More
Latest NewsSports

आंतरराष्ट्रीय बीच टेनिस स्पर्धेत भारताची घोडदौड

 पटाया (थायलँड )येथे १८-२२ ऑगस्ट ला पार पडलेल्या ITF पटाया ओपन मध्ये भारताच्या उन्नत सांगळे आणि विश्वजीत सांगळे ह्या जोडीने

Read More