fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मराठवाडा वॉटर ग्रीड योजना लवकरच मार्गी लागणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परभणी : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात हे अभियान सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणारे असल्याचे सांगितले. राज्यात मराठवाड्यासह काही भागात पावसाचे प्रमाण कमी असून परिस्थितीवर आमची बारीक नजर आहे. जिथे गरज पडेल तिथल्या शेतकर्‍यांच्या पाठीशी सरकारी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यंदा पावसाने 17 ते 21 दिवसांचा खंड दिल्याने काही भागात मोठी अडचण झालेली आहे. मराठवाड्याला दर चार-पाच वर्षांनी दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. भविष्यात ही वेळ येवू नये म्हणून मागच्या वेळी युती सरकारने हाती घेतलेली मराठवाडा ग्रीड योजना आता लवकरच पुर्ण केली जाणार आहे. यासाठी केंद्राने जलजीवन योजनेअंतर्गत जवळपास 35 हजार कोटी रूपये मिळाले. आणखी 20 ते 25 कोटीच्या निधीसाठी केंद्राला विनंती करू.तसेच पश्चिमी वाहिन्याचें वाहून जाणारे पाणी वळवून गोदावरीत सोडण्याची योजना पुर्ण करू. या महत्वाकांक्षी योजना पूर्ण झाल्यानंतर मराठवाड्याच्या पुढील पिढीला दुष्काळ पहावा लागणार नाही. समृध्दी व नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गामुळेही या भागातील चित्र बदलेल. हे सरकार आल्यानंतर अतिशय हिताचे निर्णय घेतले जात आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी महामार्गांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला. त्यातून महत्वाची कामे मार्गी लागली आहेत, असे सांगत परभणी शहरातील रस्ते जरा खराब झाले आहेत. येत्या काळात हे चित्रही बदलेल. मुख्य रस्त्यांना काँक्रीटचे केले पाहिजे. जेणेकरून दर दोन वर्षाला कंत्राटदारांकडे हे रस्ते दुरूस्तीसाठी जाणे बंद होईल. बारवांचे पुनरूज्जीवन हा उपक्रम चांगला असून पंतप्रधानांनीदेखील त्याची दखल घेतली असल्याचे ते म्हणाले. मागच्या वेळेस युती सरकारने राबविलेल्या जलयुक्त शिवार योजनेमुळे अनेक कोरडवाहू शेतकरी पाणीदार झाले. जलसंधारणच्या माध्यमातून पाण्याचा थेंब न थेंब वाचवून शेतकर्‍यांना दिलासा देवू, असेही ते म्हणाले. अनेक भागातल्या शेतकर्‍यांना दिवसा वीज मिळत नसल्याने येत्या 3 वर्षात कृषीचे सर्व फीडर सोलारवर टाकून शेतकर्‍यांना 24 तास वीज देण्याचा निर्णय सरकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d