वाचाळविरांनी महापुरूषांबद्दल चुकीची वक्तव्ये करू नयेत-उपमुख्यमंत्री अजित पवार
परभणी : महाराष्ट्रात जातीय सलोखा कायम असून त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र काहीजण विनाकारण भीती निर्माण करीत असून काही वाचाळवीर महापुरूषांबद्दल चुकीची वक्तव्ये करत आहेत, असे कुणीही करू नये कारण ते आपले आदर्श आहेत, प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राज्यात मराठवाड्यासह काही भागातील शेतकरी पावसाअभावी संकटात सापडलेला असून त्यांना शासन सर्वतोपरी मदत करणार असल्याचे ते म्हणाले. आम्ही परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेत असून संभाव्य आपत्कालीन उपाययोजनांबाबत संबंधित अधिकार्यांना आतापासूनच निर्देश दिलेले आहेत. उपलब्ध पाण्याचे काटकसरीने नियोजन करा.जनांवरांना हिरवा चारा, पिण्याचे पाणी, गवत राखीव ठेवा, पेंढ्या करा अशा सूचना संबंधित विभागाला दिलेल्या आहेत. दुबार पेरणीसाठी लागणारे बियाणे खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्याचा निर्णयही सरकार घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.