fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsPUNE

शिवाजीनगर येथे मुद्रांकन सुविधा उपलब्ध

पुणे : पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ, पुणे मध्यवर्ती कार्यालयाच्यावतीने नागरिकांच्या सोयीसाठी न्यायिकेतर (नॉन- ज्युडिशिअल) मुद्रांकांची मुद्रांकन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महामंडळाचे कार्यालय, दुसरा मजला, कुबेरा चेंबर्स, संचेती हॉस्पिटल समोर, डॉ. राजेंद्रप्रसाद पथ, शिवाजीनगर येथे ही सुविधा शासकीय सुट्टीचे दिवस वगळता सकाळी १०.३० ते सायं. ५.३० वाजेपर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी कळविले आहे.

Leave a Reply

%d