fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsSports

एके स्पोर्ट्स, एनएसएफए संघांचा तिसरा विजय !!

पुणे :  स्पोर्ट्सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे दुसर्‍या ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सुन लीग’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील ३०-३० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत एके स्पोर्ट्स आणि एनएसएफए, पुणे या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून तिसरा विजय नोंदविला.

कुलवंश वाकोडे याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर एके स्पोर्ट्सने डिलीजंट क्रिकेट क्लबचा १२८ धावांनी धुव्वा उडविला. पहिल्यांदा फलंदाजी करताना एके स्पोर्ट्सने २५८ धावांचा डोंगर उभा केला. अर्थव आखाडे याने ३६ चेंडूत १३ चौकार व २ षटकारांसह ८२ धावा चोपल्या. तनवी गुप्ते हिने नाबाद ५० धावा, राजवीर देशमुख ३७ धावा आणि कुलवंश वाकोडे याने ३५ धावांचे योगदान दिले. तिसर्‍या गड्यासाठी तनवी आणि अर्थव यांनी ५४ चेंडूत १३२ धावांची झटपट भागिदारी करून संघाला विशाल धावसंख्या उभी करून दिली. या आव्हानासमोर डिलीजंट क्रिकेट क्लबचा डाव १२५ धावांवर मर्यादित राहीला. कुलवंश वाकोडे याने १८ धावात ३ गडी बाद करून अष्टपैलू कामगिरी केली.

क्षितीज मोरगावकर याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर एनएसएफए संघाने निंबाळकर स्पोर्ट्सचा १८ धावांनी पराभव करून तिसरा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना कृष्णा मुलतानी याच्या ६४ धावांच्या जोरावर एनएसएफए, पुणे संघाने ११४ धावा धावफलकावर लावल्या. निंबाळकर संघाच्या गोविंद ठाकूरदेसाई याने ८ धावात ५ गडी बाद करून चमकदार कामगिरी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना निंबाळकर स्पोर्ट्सचा डाव ९६ धावाच करून शकला. क्षितीज मोरगांवकर याने १३ धावात ३ गडी टिपत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
एके स्पोर्ट्सः २६ षटकात ४ गडी बाद २५८ धावा (अर्थव आखाडे ८२ (३६, १३ चौकार, २ षटकार), तनवी गुप्ते नाबाद ५० (५१, ७ चौकार), राजवीर देशमुख ३७, कुलवंश वाकोडे ३५, स्वराज पवार २-३३);(भागिदारीः तिसर्‍या गड्यासाठी तनवी आणि अर्थव यांच्यात १३२ (५४) वि.वि. डिलीजंट क्रिकेट क्लबः २६ षटकात ९ गडी बाद १२५ धावा (नील अपुने ४२, जेनील पाध्या ३३, कुलवंश वाकोडे ३-१८, अर्थव आखाडे २-१६); सामनावीरः कुलवंश वाकोडे;

एनएसएफए, पुणेः २१.४ षटकात १० गडी बाद ११४ धावा (कृष्णा मुलतानी ६४ (५७, १० चौकार, १ षटकार), गोविंद ठाकूरदेसाई ५-८) वि.वि. निंबाळकर स्पोर्ट्सः ३० षटकात ७ गडी बाद ९६ धावा (आयुष अमराळे २१, वरद काकडे १५, क्षितीज मोरगांवकर ३-१३); सामनावीरः क्षितीज मोरगांवकर;

Leave a Reply

%d