fbpx
Saturday, September 30, 2023
Latest NewsPUNE

अनधिकृत बांधकामावर कारवाई

पुणे : आज भांडारकर आणि विधी महाविद्यालय येथिल जंक्शन वर असलेल्या हॉटेल Sabros वर बांधकाम विभागाचे वतीने कारवाई करण्यात आली. यावेळी सुमारे 2500 चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले.
या होटल वर यापुर्वी 3 वेळा कारवाई करण्यात आली होती. मात्र तरीही परत परत विनापरवाना बांधकाम केले जात होते. यामुळे मालक आणि चालक यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना कळविण्यात आले असून दोन दिवसात गुन्हा दाखल केला जाईल त्याच प्रमाणे सदर हॉटेल चा मद्य परवाना रद्द करणेत यावा असे राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना कळविण्यात येणार आहे असे उप अभियंता सुनील कदम यांनी सांगितले.
यावेळी सेनापती बापट रस्त्यावरील वेताळ बाबा चौक जवळील.,नव्याने बांधण्यात येत असलेली 100 फुट × 50 फुट मापाची शेड पाडण्यात आली.
या कारवाईत जेसीबी, गॅस कटर ,10 बिगारी इ चा वापर करण्यात आला. मा. बिपिन शिंदे कार्यकारी अभियंता, सुनिल कदम उप अभियंता, राहुल रसाळे यांचे मार्फत कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

%d bloggers like this: