किलेअर्क येथील 1000 मुलांच्या वसतिगृहास महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव
शासन निर्णयातून घोषणा; रिपब्लिकन विद्यार्थी सेना,पँथर्स विद्यार्थी आघाडीच्या मागणीस यश
औरंगाबाद :किलेअर्क येथील 1000 मुलांच्या शासकीय वसतिगृहास महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी रिपब्लिकन विद्यार्थी सेना व पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने सचिन निकम,गुणरत्न सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक न्याय विभागाकडे सातत्याने करण्यात येत होते महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासन निर्णय काढून ‘महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर 1000 मुलांचे शासकीय वसतिगृह’ असे नामधीकरण केले आहे.
वसतिगृहातील विविध समस्या व नाव देण्याच्या मागणीसाठी दि.१७ मे रोजी शेकडो विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलनही केले होते.
सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, तत्कालीन आयुक्त प्रशांत नारनवरे यांच्या भेटी घेऊन रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे सचिन निकम, प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे, आशिष गाडे, पँथर्स विद्यार्थी आघाडीचे गुणरत्न सोनवणे, कुणाल भालेराव, अविनाश कांबळे, सम्यक सरपे, प्रा.प्रबोधन बनसोडे,प्रवीण हिवराळे,सागर ठाकूर यांनी वारंवार पाठपुरावा केला होता.
वसतिगृहाला नाव देण्याची मागणी मान्य झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यावेळी रोहन वाकळे, निलेश वाघमारे, विश्वजित गायकवाड,किरण गायकवाड, लक्ष्मण डोईफोडे, संदिप सरोदे, विशाल पडघन, आशिष जाधव, नितीन पाईकराव, शुभम नेतने, नयन पवार, सुयोग बनसोडे, राहुल कदम, अक्षय भाग्यवंत, अजय दांडगे, मुकुंद भुक्तर, सुबोध खंदारे, विवेक खंदारे, हर्षवर्धन घनसावध, श्याम साळवे, आकाश बनकर, भावेश कोळसे आदी विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.
शासनाने वसतिगृहास महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देऊन विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण केले आहे. मात्र विद्यार्थ्यांना वेळेवर सुविधा देण्याच्या दृष्टीने प्रशासन उदासीन आहे.नाव देण्याची मागणी पूर्ण झाली असली तरी वसतिगृहातील समस्यांचा पूर्ण निपटारा होऊन हे वसतिगृह संपूर्ण सुविधांनी सज्ज करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.
- सचिन निकम
मराठवाडा अध्यक्ष, रिपब्लिकन विद्यार्थी सेना