श्री शिवाजी मराठा सोसायटीत विद्यार्थ्यांनी हातात झेंडे घेऊन समूहगान करीत भारतमातेला केले अभिवादन
पुणे : देशाचा झेंडा फडकतो तेव्हा त्या झेंड्याकडे बघून आपल्याला अभिमान वाटतो. झेंड्याकडे पाहून देशासाठी काम करण्याची स्फूर्ती मिळते. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर जे स्वप्न आपण पाहिले त्याची पूर्ती झाली आहे का हे पहायला हवे. देशाला जागतिक स्तरावर आणखी पुढे नेण्यासाठी विद्यार्थ्यांनी आणि तरुणवर्गाने पुढे यायला हवे. असे मत खासदार वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले.
श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे आयोजन शुक्रवार पेठेतील शिवाजी मराठा सोसायटीच्या प्रांगणात करण्यात आले होते. यावेळी श्री शिवाजी मराठा सोसायटीचे मानद सचिव अण्णा थोरात, मानद सहसचिव विकास गोगावले, कमलताई व्यवहारे, जगदीश जेधे व इतर पदाधिकारी आणि शिक्षक उपस्थित होते.
वंदना चव्हाण म्हणाल्या, स्वतंत्र भारतासमोर अनेक आव्हाने आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत देश पुढे जातोय परंतु जाती -धर्माची तेढ नष्ट करणे गरजेचे आहे. माणसामाणसामध्ये सलोखा कसा राहील यासाठी तरुणांनी प्रयत्न करायले हवेत.
