Wednesday, May 6, 2026
BusinessLatest News

आंतरराष्ट्रीय गोलमेज परिषद संपन्न

पुणे: जागतिक पातळीवरील आणि पारंपरिक धर्मांच्या नेत्यांच्या ७व्या काँग्रेसचे महत्त्व आणि काँग्रेसचा जाहीरनामा या विषयावर मुंबईतील सोमैया विद्याविहार युनिव्हर्सिटी येथे आंतरराष्ट्रीय गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. के. जे. सोमैया इन्स्टिट्यूट ऑफ धर्म स्टडीजतर्फे नूरसुल्तान नझरबायेव्ह सेंटर फॉर द डेव्हलपमेंट ऑफ इंटरफेथ अँड इंटर-सिव्हिलायझेशन डायलॉग या संस्थेच्या सहयोगाने ही परिषद आयोजित करण्यात आली होती.विविध धार्मिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या प्रख्यात वक्त्यांनी आपापली भूमिका मांडली आणि सप्टेंबर २०२२ मध्ये कझाकस्तानमधील अस्ताना येथे आयोजित ७ व्या काँग्रेसचे महत्त्व अधोरेखित केले. विविध धार्मिक धारणांमधील समान मानवी मूल्ये समजून घेण्यात या काँग्रेसने महत्त्वाची भूमिका पार पाडली आणि महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांबाबत सकारात्मक संवाद आणि निर्णय घेण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. २००३ मध्ये स्थापना झाल्यापासून या काँग्रेसचा दीर्घकालीन प्रभाव राहिलेला आहे, अशी या परिषदेसाठी उपस्थित अभ्यागतांनी प्रशंसा केली. कारण या काँग्रेसमध्ये विविध धर्म व संस्कृतींचे प्रतिनिधी, सरकारी मंडळे, शिक्षणक्षेत्र आणि तरुणांच्या संघटना, असे समाजातील विविध स्तरातील भागधारक समाविष्ट करून घेण्यात आले. सोमैया विद्याविहार येथे आयोजित गोलमेज परिषदेत या विद्यापीठातील विविध शाखांमधील शंभरहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.

सोमैया विद्याविहारचे अध्यक्ष, सोमैया विद्याविहार युनिव्हर्सिटीचे कुलपती आणि कझाकस्तानमधील अस्तानामधील जागतिक व पारंपरिक धर्मांच्या काँग्रेसच्या हिंदू शिष्टमंडळाचे नेते समीर एस. सोमैया म्हणाले, “कझाकस्तानमधील अस्तानमध्ये आयोजित जागतिक व पारंपरिक धर्मांच्या नेत्यांच्या सातव्या काँग्रेसमध्ये सहभागी होता येणे हा आमचा बहुमान आहे. भारत-कझाकस्तान संबंध मजबूत करण्यासाठी आणि जगभरात शांतता व एकोपा नांदाव यासाठी विविध धर्मांमध्ये सुसंवादाच्या महत्त्वावर या परिषदेत भर देण्यात आला. मानवतेच्या हितासाठी आपल्या विविध परंपरांच्या मूल्यांचे जतन करणे आणि त्या जोपासणे ही आपली सामुहिक जबाबदारी आहे.”

कझाकस्तानमधील एन. नझरबायेव्ह सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ इंटरफेथ अँड इंटर-सिव्हिलायझेशन डायलॉगच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष एच. ई. श्री. बुलत सरसेनबायेव्ह म्हणाले, “जागतिक पातळीवरील व पारंपरिक धर्मांच्या नेत्यांच्या सातव्या काँग्रेसमध्ये समान मानवी मूल्यांचा शोध घेण्यासाठी विविध राष्ट्रे एकत्र आली. या गोलमेज परिषदेमुळे विविध धर्मांमध्ये सुसंवाद निर्माण करणे आणि विविध संस्कृती व धर्मांमध्ये परस्परसहिष्णूता व आदर निर्माण करण्याला चालना देण्याचा आमचा निर्धार अधिक मजबूत झाला आहे. परस्परांशी संवाद साधूनच आपण शांततामय व सर्वसमावेशक जग निर्माण करू शकतो.” त्याचप्रमाणे या केंद्राच्या संचालक मंडळाचे अध्यक्षांनी या व्यतिरिक्त, केंद्राच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षांनी काँग्रेसच्या सचिवालयाच्या आगामी वर्धापन दिनाच्या २१ व्या सत्राच्या तयारीची माहिती दिली. अस्तानामध्ये १०-११ ऑक्टोबर रोजी कझाकस्तानच्या संसदेच्या सिनेटचे अध्यक्ष मौलेन अशिमबायेव्ह यांच्या नेतृत्वाखाली हे सत्र होणार आहे.”

भारतासाठीच्या कझाकस्तान प्रजासत्ताकाच्या मिशनचे उपप्रमुख एच. ई. श्री. अझत सेरिकबोसीनुली म्हणाले, “विविध धर्मांमधील एकोपा व एकतेला चालना मिळावी यासाठी कझाकस्तानतर्फे होणारे सातत्यपूर्ण प्रयत्न हे जगासाठी एक आदर्श उदाहरण आहे. कझाकस्तानमध्ये १३० वांशिक कट एकोप्याने राहतात. त्यांच्या भाषा, संस्कृती जतन करण्याला आम्ही प्राधान्य देतो आणि सर्व धर्माच्या लोकांना समान संधी देण्यात येतात. जगभरातील धर्मांमधील समान धागा शोधण्यासाठी आमच्यातर्फे देण्यात असलेल्या पाठिंब्यातून जागतिक पातळीवरील सुसंवादाला आम्ही देत असलेले महत्त्व दिसून येते. एक खुले आणि स्वागतेच्छुक राष्ट्र म्हणून आम्ही भारतीय नागरिकांसाठी व्हिसा-मुक्त व्यवस्था सुरू केली आहे. या माध्यमातून संस्कृती आणि श्रद्धांची देवाण-घेवाण करण्याचा आमचा मानस आहे. जगभरातील विविध नागरी संस्कृती आणि धर्मांमध्ये शांतता व सहयोगाला चालना देण्यासाठी कझाकस्तान कायम प्रयत्नशील आहे. कझाकस्तान प्रजासत्ताक हे राष्ट्रीय व आंतरधर्मीय मतैक्याचे सकारात्मक उदाहरण आहे. शांततेने प्रत्येकाचाच फायदा होतो आणि युद्ध किंवा संघर्ष केवळ काही जणांसाठी लाभदायक असतो, याचा हा पुरावा आहे.

के. जे सोमैया इन्स्टिट्यूट ऑफ धर्म स्टडीजच्या संचालक सुप्रिया राय म्हणाल्या, “के जे सोमैया इन्स्टिट्यूट ऑफ धर्म स्टडीजमध्ये, जागतिक पातळीवर शांतता व सामंजस्याला चालना देण्याचे माध्यम म्हणून आंतरधर्मीय सुसंवादाचा प्रसार करण्यासठी आम्ही प्रयत्नशील असतो. सातव्या काँग्रेसचे महत्त्व आणि सर्व धर्म व संस्कृती यांच्या एकोपा व परस्परांसाठी आदर निर्माण व्हावा यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याची आवश्यकता याबद्दल या गोलमेज परिषदेमुळे अनेक बारकावे समजले आणि शिकवणही मिळाली.”या आंतरराष्ट्रीय गोलमेज परिषदेमुळे, शांतता, एकोपा आणि परस्परसामंजस्यावर आधारित जग उभारण्यासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवण्यासाठीच्या सर्व भागधारकांचा निर्धार अधिक मजबूत झाला.  विविध सभ्यता, संस्कृती आणि धर्मांमध्ये जागतिक पातळीवर सुसंवादा घडण्यासाठी चालना देण्यासाठी भविष्यातील आंतरधर्मीय उपक्रमांसाठी सहयोग देण्यासाठी व सहभागी होण्यासाठी या परिषदेतील सहभागींनी निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading