Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest News

निर्मितीकडून पुन्हा अभिनयाकडे: शर्मिष्ठा राऊत

सारं काही तिच्यासाठी ह्या मालिकेबद्दल काय सांगशील?

– सर्वात आधी सांगू इच्छिते की ही कथा दोन बहिणींवर आधारित आहे. ज्या दोन वेगवेगळ्या संस्कृती मध्ये राहतात, त्यांच्यामध्ये वेगळेपण असूनही किती साम्य असू शकते हे दिसून येईल. प्रेक्षकांनी प्रोमो बघितलाच असेल आणि मला खात्री आहे की प्रेक्षक ह्या मालिकेशी भावनिकरित्या जोडले जातील. कुटुंबामध्ये आपल्यापैकी प्रत्येकाला भाऊ-बहीण असतील पण ते आपल्या जवळ असतीलच असं नाही, काही जण कामासाठी, शिक्षणासाठी दूर परदेशात असतात तर  काही वेगळ्या कारणांमुळे एकमेकांपासून दुरावलेले असतात, पण कितीही अंतर असलं तरीही मनाने आपण जवळच असतो. संस्कृती आणि नातेसंबंध हे किती महत्वाचे आहेत हे प्रेक्षकांना ह्या मालिकेतून बघायला मिळेल.

 

संध्या तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील?

– ही गोष्ट आहे २ सख्ख्या बहिणींची ज्या गेले २० वर्ष एकमेकींना भेटल्या नाहीत. मोठी बहीण उमा तळकोकणात आपल्या सासरी सुखाने नांदतेय आणि लहान बहीण संध्या तिच्या मुली सोबत गेले २० वर्ष लंडनमध्ये स्थायिक आहे. दोघींच्या आयुष्यात २० वर्षांपूर्वी एक अशी घटना घडली ज्यामुळे त्या एकमेकींना कायमच्या दुरावल्या. पण म्हणतात ना रक्ताची नाती कितीही लांब गेली तरी मनातला जिव्हाळा कमी होत नाही. मलाही एक लहान बहीण असल्यामुळे मला ही भूमिका खूप जवळची वाटते. दोन बहिणींच्या नात्याबद्दल व त्या एकमेकींशी कशा जोडलेल्या असतात ह्या बद्दल मला अप्रूप आहे. जेव्हा तुमचे आई-वडील तुमच्या जवळ नसतात तेव्हा तुम्हाला एकच व्यक्ती समजून घेऊ शकते ती म्हणजे तुम्ही बहीण असते. 

 

जेव्हा तुला या मालिकेसाठी विचारलं त्यावेळेस तुझी काय प्रतिक्रिया होती?

– मला आज पर्यंत जेवढ्या भूमिका मिळाल्या त्या सगळ्या मी यशस्वीपणे साकारल्या. मला मिळालेल्या भूमिकांना जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न करते. कलाकाराने हे विसरू नये की एखादी संधी तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवू शकते.

 

तुझ्या वैयक्तिक अनुभवाबद्दल सांगआता पर्यंतचा प्रवासाबद्दल काय सांगशील?

–   माझ्या करिअरच्या प्रवासात झी मराठीचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. उंच माझा झोका, फू बाई फू, जुळून येती रेशीमगाठी या सर्व अप्रतिम कलाकृतींमध्ये मला या बहिणीबरोबर काम करण्याची संधी मिळाली. माझ्या करियरचा सर्वात मोठा टप्पा म्हणजे, मी आणि माझा नवरा तेजस दोघेही झी मराठी सोबत आमचं पहिलं प्रोजेक्ट करत आहोत ते म्हणजे ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका आणि ह्या मालिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतो आहे, आणि त्याचप्रमाणे माझी भूमिका असलेल्या ‘सारं काही तिच्यासाठी’ ह्या मालिकेला देखील प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे.

तेव्हा पाहायला विसरू नका “सारं काही तिच्यासाठी” २१ ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार संध्या.  ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading