Saturday, May 9, 2026
Latest NewsPUNE

‘‘माझी माती माझा देश” अंतर्गत पुणे महापालिकेत पंचप्रण शपथ

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळा दि. ९/८/२०२३ पासून सुरु झाला आहे. सदर सांगता सोहळ्याच्या निमित्त राज्यात ‘‘मेरी माटी मेरा देश” हा उपक्रम देशभर साजरा करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमा अंतर्गत आज दि. ९/८/२०२३ रोजी पुणे महापालिका प्रांगणातील महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्णाकृती पुतळ्यानजीक हिरवळीवर ‘‘पंचप्रण शपथ” घेण्यात आली.
पुणे महानगरपालिका मा. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शपथ घेतली, त्या पाठोपाठ उपस्थित मनपा अधिकारी व कर्मचारी यांनी शपथ घेतली.
याप्रसंगी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) रविंद्र बिनवडे, मा. उप आयुक्त (सामान्य प्रशासन) सचिन इथापे, मा. मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी व अन्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading