Tuesday, September 1, 2026
Latest NewsPUNE

बार्टी आणि वाडिया महाविद्यालय यांच्यात सामाजस्य करार

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था आहे. या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी बँक, रेल्वे एल. आय सी व इतर तत्सम परीक्षा (IBPS) तसेच पोलीस व मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतात..

IBPS मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनी च्या भरतीमध्ये CRP – PO/MT-XIII पदासाठी व स्पेशालिस्ट ऑफिसर CRP – SPL – XIII या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेत अनुसूचित जातीतील विद्यार्थ्याचा टक्का वाढविण्यासाठी बार्टी, पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या युवक-युवतींसाठी पुणे या ठिकाणी मॉडर्न एजुकेशन सोसायटीचे नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे १९, लेट प्रिन्स. व्ही.के. जाग पथ, पुणे ४११००१ या महाविद्यालयामार्फत पुढील सहा महिने कालावधी करिता बँक, रेल्वे एल. आय सी व इतर तत्सम परीक्षा पूर्व (IBPS) प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
याचे स्वरूप: विद्यार्थ्यांना प्रती महिना ६०००/- विद्यावेतन + शैक्षणिक साहित्यासाठी ५०००/- एकरकमी र.
पात्रता : १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी संख्या : १००कालावधीत : ६ महिने
सदर प्रशिक्षणासाठी ३० टक्के जागा महिलांसाठी, ४ टक्के जागा “दिव्यांग” असलेल्या व्यक्तींसाठी ( Person With Disability), ५ % जागा अनुसूचित जाती अंतर्गत वंचित जाती मधील ( वाल्मिकी व तत्सम जाती- होलार, बेरड, मांग, मातंग, मांग गारुडी, मादगी, ई.) विद्यार्थ्यांकरिता आरक्षित राहतील.

अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०२३ राहील, चाळणी परीक्षा दिनांक १० सप्टेंबर २०२३ रोजी मॉडर्न एजुकेशन सोसायटीचे नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे १९, लेट प्रिन्स. व्ही. के. जाग पथ, पुणे ४११००१ या महाविद्यालयात आयोजित करण्यात येईल. सदर प्रशिक्षण कार्यक्रम नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे यांच्या प्राचार्या प्रो.डॉ. वृषाली रणधीर व डॉ. लक्ष्मण भैसाने, सहा.प्राध्यापक तथा समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे.
सदर योजना बार्टी संस्थेचे मा. महासंचालक सुनील वारे तसेच संस्थेच्या निंबधक श्रीमती इंदिरा अस्वार, श्रीमती स्नेहल भोसले अपर जिल्हाधिकारी तथा विभागप्रमुख व डॉ. संत्येद्रनाथ चव्हाण उपायुक्त तथा विभागप्रमुख यांच्यामार्फत सर्व विद्यार्थ्यांनी सदर प्रशिक्षणासाठी अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे .
विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी https://barti.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळास भेट द्यावी.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading