यशस्वी होण्यासाठी कष्टाचे व त्यागाचे बलिदान देण्याची गरज – संजय येनपुरे विशेष पोलिस महानिरीक्षक
पुणे : आम्ही मुळशीकर प्रतिष्ठानच्या वतीने १० व १२ विद्यार्थ्यांना आम्ही गेली १७ वर्ष त्यांच्या कलागुणांना वाव देत आहोत. प्रतिष्ठानच्या माध्यातून आम्ही २ दशकांपासून नोकरी महोत्सव, वाचनालय, स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. असे ऍड गणेश सातपुते हे आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. या प्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटन व मार्गदर्शक संजय येनपुरे विशेष पोलिस महानिरीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण पुणे विभाग हे होते.
संजय येनपुरे म्हणाले, की मुली या मुलांपेक्षा जास्त कष्टाळू व फोकस असतात. सध्या मुलींचे समाजातील योगदान उल्लेखनीय आहे. करिअर करताना प्रत्येक विद्यार्थ्यांकडे जिद्द, चिकाटी, ईर्ष्या तुमच्या मनात असली पाहिजे. तसेच कष्ट करायची तयार असल्यास यशाचे अवकाशात गगनभरारी घ्याला तुम्हाला कोणीही आडवू शकत नाही. ते पुढे म्हणाले, की सातपुते आणि त्यांच्या प्रतिष्ठानचे समाजातील कार्य मोलाचे आहे. आयुष्याच्या प्रवासात यशस्वी होण्यासाठी कष्टाचे व त्यागाचे बलिदान द्यावे लागेल. स्वतःशी बोला, स्वतःसाठी वेळ काढा त्याशिवाय तुम्हाला यशाचा राजमार्ग मिळणार नाही. काही प्रश्न सोडविल्याने सुटतात तर काही प्रश्न सोडल्यानंतर सुटतात.
समाजामध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या भाग्यश्री माझिरे, निकिता मुरकुटे, सायली गरे, नम्रता मारणे, प्रीती शिंदे, अमित फाले, काव्या डोग, शेखर धुमाळ, सचिन येणपुरे यांचा विशेष सन्मान करून गौरविण्यात आले. तर चैतन्य मोगल, अर्णव फाटक, प्रिया पळसकर, समीक्षा चोरगे, आर्या लायगुडे, यश शिंदे, ओम शिरसाट, सिद्धार्थ चव्हाण, आदित्य शेडगे आदी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी १०० हुन अधिक जास्त विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मान करण्यात आला. आदित्य सातपुते, महेश महाले, सिताराम तोंडे-पाटील, राजेंद्र उभे, निवृत्ती येवले, विकास डोख, अनंता दहीभाते यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले तर माऊली डफळ, सुरेश साळुंखे, राम गायकवाड, जगदीश जगताप, रमेश उभे, दत्तात्रय शिंदे, सुरेश भरम कार्यक्रमासाठी योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंडू दातीर यांनी तर आभार सिताराम तोंडे-पाटील यांनी मानले.
