MMTC-PAMP पुणे येथे पहिले खास दालन लाँच
पुणे: MMTC-PAMP या भारतातील एकमेव एलबीएमए- प्रमाणित सोने व चांदी रिफायनरीने विस्तार करण्याचे धोरणात्मक पाऊल उचलले आहे. पुणे शहराला सोने आणि चांदीप्रती वाटणारा जिव्हाळा लक्षात घेत कंपनीने आपले पहिले ‘प्युरिटी व्हेरिफिकेशन सेंटर’ सुरू केले असून हे दालन विश्वास, शुद्धता आणि सचोटीचे आश्वासन जपणारे असेल. ग्राहकांना इथे ९९९.९ शुद्ध सोने (२४के) आणि चांदीची उत्पादने खरेदी करता येतील. MMTC PAMP पुण्यात दालन सुरू करत ग्राहकांना उच्च दर्जा असलेली सोने व चांदीची उत्पादने पुरवत त्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्याचे ठरवले आहे. इथली उत्पादने चोख स्विस कारागिरीतून तयार करण्यात आली आहेत.
विकासावर भर देत MMTC-PAMP शुद्ध सोने व चांदीची नाणी बार्स यांचे कलेक्शन तसेच क्लासिक, भक्तीपूर्ण, संग्रही ठेवण्यासाठी आणि भेट देण्यासाठी विविध प्रकारची उत्पादने तयार केली आहेत. त्याशिवाय पुणेकरांना त्यांचे जुने सोने तज्ज्ञांकडून पारखून घेत MMTC-PAMP पारदर्शक प्रक्रियेद्वारे परत विकता येईल. ही प्रक्रिया जास्तीत जास्त अचूकतेने पार पाडत खरे मूल्य सांगितले जाते. हे मूल्यांकन MMTC-PAMP प्रमाणित व अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच सॉफ्टवेयरच्या मदतीने केले जात असल्यामुळे पारंपरिक कसाच्या दगडावर केल्या जाणाऱ्या परीक्षणाच्या तुलनेत जास्त खरे मूल्य समजण्यास मदत होते.
पुणे दालनाचा पत्ता – MMTC-PAMP, युनिट क्रमांक ५ आणि ६, ५५९ – साई प्लॅटिनम बिल्डिंग, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.
या घोषणेविषयी MMTC-PAMP व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विकास सिंग म्हणाले, ‘MMTC-PAMP आम्ही ग्राहकांना सोने आणि चांदीची सर्वोत्कृष्ट उत्पादने पुरवत त्यांच्या वारशाचा भाग बनण्याचा प्रयत्न करतो. सांस्कृतिकदृष्ट्या जवळचे वाटणारे, परंपरेचं पालन करणारे व अत्याधुनिक स्विस तंत्रज्ञानाने युक्त प्रत्येक नाणे व बार सर्वोच्च शुद्धतेसह बनवण्यात आले आहे. आमची पीव्हीसी (प्युरिटी व्हेरिफिकेशन सेंटर्स) ग्राहकांची मानसिकता लक्षात घेऊन त्यांना दर्जेदार सेवा व समाधान देण्याच्या हेतूने तयार करण्यात आली आहेत. आमची कंपनी भारतातील पहिली आणि एकमेव लंडन बुलियन मार्केट असोसिएशन (एलबीएमए) गुड डिलीव्हरी रिफायनर असून सोने व चांदीच्या उत्पादनांसाठी प्रमाणित आहे. कंपनीद्वारे सर्वात शुद्ध आणि दर्जेदार कारागिरी असलेली उत्पादने पुरवली जातात. पुण्यात प्रवेश करण्याचा निर्णय कंपनीच्या विस्तार प्रक्रियेतील स्वाभाविक निर्णय असून त्यामुळे प्रेशियस मेटल यंत्रणेतील आमचे आघाडीचे स्थान अधिक बळकट होण्यास मदत होईल.’
२००८ मध्ये स्थापन करण्यात आलेली MMTC PAMP ही सोने आणि चांदी, बुलियन (सोने आणि चांदी), मिंटेड कॉइन्स (सोने आणि चांदी) प्रेशियस मेटलसाठीची भारतातील एकमेव सर्वसमावेशक यंत्रणा असून तिथे पुनर्खरेदी व जुन्या सोन्याचे पुनर्नूतनीकरणही होते. MMTC-PAMP ही डिजिटल सोने क्षेत्रात भारतात आघाडीवर असून पॅन भारतात कंपनीचा मोठा ग्राहकवर्ग आहे. MMTC-PAMP देशभरातील आपले स्थान बळकट करून ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ब्रँडने प्रेशियस मेटल बाजारपेठेतील आपले अस्तित्व विस्तारण्याचे ठरवले आहे. MMTC-PAMP नुकतीच दिल्ली, गाझियाबाद, नॉयडा आणि लुधियाना येथे नवी केंद्रे सुरू करत ग्राहकांना विश्वासार्ह व शुद्ध प्रेशियस मेटलपासून बनवलेली उत्पादने उपलब्ध करून दिली आहेत.
प्रत्येक MMTC PAMP उत्पादनावर एकमेवाद्वितिय क्रमांक दिलेला असतो आणि ते असायर प्रमाणित सर्टिकार्डमध्ये पॅक केलेले असते. त्यावरून उत्पादनाची अस्सलता लक्षात येते. MMTC-PAMP उत्पादनांचा वेट टॉलरन्स सकारात्मक बाजूकडे झुकणारा असून त्यामुळे खरेदी केले जाणारे प्रत्येक नाणे आणि बार नोंदणी केलेल्या वजनापेक्षा जास्त असल्याची खात्री मिळते. त्यामुळे ग्राहकाला त्याच्या गुंतवणुकीचे पूर्ण मूल्य मिळते. MMTC-PAMP नव्याने लाँच केलेले पीव्हीसी सोने व चांदीच्या उत्पादन क्षेत्रात खात्रीशीर ब्रँडच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी योग्य आहे.
