‘ई-इन्वॉयसिंग अनिवार्य’ या १ ऑगस्ट पासून लागू होणाऱ्या नियमाचे पालन करण्यासाठी टॅली सोल्यूशन्स एमएसएमईंना सहाय्य करणार
पुणे : भारत सरकारने पाच कोटी आणि त्यापेक्षा जास्त उलाढाल असलेल्या जीएसटी नोंदणीकृत व्यवसायांसाठी १ ऑगस्ट २०२३ पासून ई-इन्वॉयसिंग अनिवार्य केले आहे. व्यवसायांमध्ये ई-इन्वॉयसिंग स्वीकारण्याची सरकारने दिलेली मुदत संपत आली असल्याने टॅली सोल्यूशन्स आपल्या टॅली प्राईम ३.० (TallyPrime 3.0) या सर्वसमावेशात्मक, बहूआयामी आणि व्यापक अश्या उपाय योजनेच्या माध्यमातून व्यवसायांना ई-इन्वॉयसिंगमध्ये सहजपणे संक्रमण करायला आणि ते कुशलतेने व्यवस्थापित करायला मदत करण्यासाठी सज्ज आहे. व्यवसायांनी आवश्यक नियमांचे सातत्याने पालन करत राहावे म्हणून आवश्यक व महत्त्वपूर्ण सुधारणांबाबत संपूर्ण पुण्यातील व्यवसायांना प्रशिक्षण देण्यासाठी टॅली सोल्यूशन्स व्यापक प्रमाणावर प्रयत्न करत आहे.
ई-इन्वॉयसिंगचा स्वीकार करण्याच्या प्रसारासाठी साल २०२० पासून टॅली सोल्यूशन्स आघाडीवर आहे. एमएसएमईंना या नवीन नियमांचे सहजपणे अवलंब करता यावे म्हणून मदत करण्यासाठी कंपनीने पुण्यामध्ये अगदी ३६० डिग्रीचे म्हणजे सर्व प्रकारे मदत करणारे प्रशिक्षण अभियान सुरू केले आहे. पुण्यातील जवळपास १८४३४८ पेक्षा जास्त व्यवसायांना ई-इन्वॉयसिंग, ई-वे बिल, ऑडिट ट्रेल यांचे परिणाम समजून घेण्यासाठी मदत करणे आणि व्यवसाय उत्पादकता आणि नफा वाढवताना सहज संक्रमणामध्ये तंत्रज्ञानाची भूमिका समजून घेण्यासाठी सहाय्य करणे हे या अभियानाचे ध्येय आहे. हे अधिनियम अमलात येण्याची ही वेळ देखील फार योग्य व सोईस्कर आहे, कारण टॅलीने अलीकडेच टॅली प्राईम ३.० (TallyPrime 3.0) बाजारात आणले. टॅली प्राईम ३.० (TallyPrime 3.0) हे एक सुधारित आणि मजबूत रिपोर्टिंग क्षमतांनी भरलेले असे नियमांचे पालन करता येण्यासाठी एक उपयुक्त इंजिनच आहे; जे अनेक जीएसटीआयएनचे व्यवस्थापन सुव्यवस्थित करण्यासाठी खास करून तयार केले आहे. टॅली प्राईम ३.० (TallyPrime 3.0) मध्ये अधिक चांगले जीएसटी रेट सेटअप, जीएसटी रिटर्न्सची जलद उपलब्धता आणि संकलन चक्राचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी व्हावा यासाठी एक सर्वसमावेशात्मक असे पेमेंट रिक्वेस्ट फिचर ही वैशिष्ठ्य आहेत. कंपनी ई-इन्वॉयसिंगच्या अंमलबजावणीबाबत जागरूकता वाढवण्यासाठी अतिस्थानिक म्हणजेच खासकरून विशिष्ट मर्यादित स्थानिक गटांसाठी अभियान, उद्योग क्षेत्रातील संस्थांची सहभागीदारी आणि जागरूकता आणणारी व माहिती आणि ज्ञान देणारी सत्रे आयोजित करत आहे. ई-इन्वॉयसिंग स्वीकारण्यासाठी व त्याच्या कामकाजामध्ये कार्यक्षमता आणण्यासाठी व्यवसायांना जे ज्ञान व उपाय लागतात त्यामध्ये व्यवसायांना सक्षम करायला टॅली सोल्यूशन्स वचनबद्ध आहे.
टॅली सोल्यूशन्सचे इंडिया बिझनेस प्रमुख जॉइस रे या अभियानाबाबत बोलताना म्हणाले, “१ ऑगस्ट २०२३ पासून पाच कोटी आणि त्यापेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यवसायांसाठी ई-इन्वॉयसिंग अनिवार्य करून ई-इन्वॉयसिंगची व्याप्ती वाढवण्याचा भारत सरकारचा निर्णय उद्योग क्षेत्रातील एका मोठ्या समुदायाला अनुपालन प्रणालीमध्ये समाविष्ट करून घेण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. अधिक कार्यकुशलता, पारदर्शकता आणि नफा आणण्यासाठी गेल्या ३-४ वर्षांमध्ये असे उपक्रम हे गेम चेंजर ठरले आहे. भारतातील व्यवसायांच्या ई-अॅडॉप्टेशनच्या म्हणजेच इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या प्रवासाला चालना देण्यासाठी साल २०२० पासून टॅलीने बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका पाहणे हे खरोखरच उत्साहवर्धक आहे आणि कंपनीचे हे कार्य हेच दर्शवते की, टॅली हे देशातील सर्वाधिक पसंतीचे ई-इन्वॉयसिंग सॉफ्टवेअर बनले आहे. १ ऑगस्ट २०२३ पर्यंत भारतातील सात लाखांपेक्षा जास्त व्यवसायांना ई-इन्वॉयसिंगचा अवलंब करणे आवश्यक आहे. ही बाब टॅलीला आपले स्थान अजून मजबूत करण्यासाठी आणि देशात आपली व्याप्ती वाढविण्यासाठी एक उत्कृष्ट व्यावसायिक संधी मिळवून देईल. गेल्या तीन दशकांच्या आपल्या प्रवासामध्ये टॅलीने कमावलेला विश्वास आणि ई-इन्वॉयसिंगचा अवलंब करण्यासाठी सर्वात लोकप्रिय असे तंत्रज्ञान भागीदार म्हणून त्याचे स्थान हे एमएसएमई परिसंस्था व त्यांच्या परिवर्तनाच्या प्रवासामध्ये टॅलीच्या अढळ वचनबद्धतेचे प्रमाण आहे.”
ई-इन्वॉयसिंगचा अंमलबजावणीच्या या पूर्वीच्या टप्प्यामध्ये अधिक मोठी उलाढाल असलेल्या व्यवसायांना टॅलीने आधी सहाय्य केलेले असल्यामुळे आता पुण्यातील व्यावसायिक समुदायाच्या या मोठ्या वर्गाला सुद्धा मदत करण्यासाठी टॅली पुर्णपणे सज्ज आहे. सर्वसमावेशक आणि व्यापक असे व्यवसाय व्यवस्थापन उपाय पुरविण्याचा तीन दशकांहून जास्त अनुभव असलेले आणि एमएसएमईच्या आवश्यकतांची सखोल माहिती असलेले टॅली सोल्यूशन्सने गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या व्यवसाय व्यवस्थापन उपायांनी २.३ दशलक्ष व्यवसायांना यशस्वीरित्या मदत केली आहे. २८,००० पेक्षा जास्त भागीदारांचे प्रचंड मोठे आणि विस्तृत असे कंपनीचे नेटवर्क त्यास संपूर्ण देशभरातील व्यावसायिकांपर्यंत पोहोचण्यास सक्षम करते. टॅलीच्या विश्वासार्ह, वापरकर्त्यांसाठी अनुकूल, जुळवून घेण्यास सोपे असे उपाय यामुळे टॅली हा भारतातील लघु आणि मध्यम उद्योगांचा एक आवडता पर्याय आहे.
