राज्यात पाच दिवसात पावसाचा जोर वाढणार; उद्या पुण्यासह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट
मुंबई : गेल्या आठवडाभरा पासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. काही ठिकाणी मुंबई, पालघर, कोल्हापूर येथे मुसळधार तर काही ठिकाणी पावसाने अजूनही दडी मारलेली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुण्यासाह अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली आहे. तर पुढील पाच दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.तसेच उद्या (दि. 27) मुंबई, पुण्यासह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित व वायव्य दिशेला तिची हालचाल होण्याची शक्यता असल्याने पुढील ५ दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण आठवडा मुसळधार पावसाची शक्यता आहे. आयएमडीनुसार जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, उद्या (दि. 27) पुण्यासह रत्नागिरी, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, नांदेड, परभणी, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, नांदेड, वर्धा, नागपूर आदी ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे.
26/7: बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित व वायव्य दिशेला तिची हालचाल होण्याची शक्यता असल्याने पुढील ५ दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 26, 2023
pl kp watch on hevy rainfall alerts in state in next 5 days;Mumbai,Thane Raigad Rtn,ghat areas of Pune, Satara & more https://t.co/XVjLG7bduz
