Wednesday, June 10, 2026
BusinessLatest News

पुण्यात कोलियर्स इंडियाचे नवीन जागेत कार्यालय सुरु

पुणे  : रिअल इस्टेट व्यावसायिक सेवा क्षेत्रातील विश्वास मिळविलेली अग्रणी कंपनी कोलियर्स ही पुण्यातील आपले कामकाज वाढवित आहे. तिच्या महत्त्वाकांक्षी वाढीच्या योजनांमुळे कंपनीने कल्याणीनगर येथे नवीन मोठ्या कार्यालयात स्थलांतर केले आहे. त्याचे उद्घाटन कॉलियर्स इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सांके प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी कॉलियर्स इंडिया पुण्याचे व्यवस्थापकीय संचालक अनिमेष त्रिपाठी आणि कॉलियर्स इंडियाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अर्जेनियो अंताओ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. शहरातील कर्मचारी संख्या दुप्पट करूनस्थानिक बाजारपेठेत प्रवेश करणेग्राहक संबंध वाढवणे आणि व्यवसायाचा विस्तार करणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

निवासीव्यावसायिक आणि औद्योगिक यांच्यासह इतर अनेक रिअल इस्टेट वर्गांसाठी वाढती मागणी पाहतापुणे हे रिअल इस्टेटच्या सर्वांत प्रमुख केंद्रांपैकी एक असून विकसकगुंतवणूकदार आणि जागा घेणारे यांच्यासाठी ती सर्वाधिक संधी असलेली बाजारपेठ आहे. प्रादेशिक बाजारपेठांमध्ये आतापर्यंत लाभ घेण्यात न आलेल्या संधीचा शोध घेण्याच्या आकांक्षा सह कंपनी आपली क्षमता वाढवित असून भारतातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करत आहे. कंपनीने २०२३ मध्ये ४०० कर्मचारी नियुक्त करण्याची आपली वाढीची योजना सामायिक केली. २०२५ पर्यंत कोलियर्सची पुण्यातील बाजारपेठेतील हिस्सा दुप्पट करण्याची योजना आहे.

कोलियर्स इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संकेय प्रसाद म्हणाले कीआमची पुण्यातील टीम नव्या कार्यालयात जात आहेही घोषणा करताना मला आनंद होत आहे. नवी जागा ही उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढविणाऱ्या आधुनिक सुविधांनी युक्त आहे. तंत्रज्ञानशाश्वतता आणि आरामशीरपणा यांचा मिलाफ झाल्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांना येथे कामाचा समृद्ध अनुभव मिळेलयाबाबत मी आशावादी आहे.

पुण्याचे व्यवस्थापकीय संचालक अनिमेष त्रिपाठी म्हणाले कीआम्ही पुण्याचे कामकाज या अत्याधुनिक आणि अचंबित करणाऱ्या नव्या कार्यालयात नेत आहोत. हा नवीन अध्याय सुरू करताना आम्हाला खरोखर आनंद होत आहे. पुणे ही देशातील एक जोरदार बाजारपेठ असून इथे रिअल इस्टेट क्षेत्रासाठी जबरदस्त संभावना आहे. शैक्षणिक केंद्राकडून तंत्रज्ञानाचे केंद्र होताना या शहराने झपाट्याने गती पकडली आहे. आमच्या क्षमता वाढविण्यासाठी आणि बाजारपेठेच्या नव्या गरजा भागविण्यासाठी मदत करण्याकरिता उद्योगातील अनुभवी नेते आणि तरुण व उमेदीच्या व्यावसायिकांना आणण्यासाठी आमच्यासाठी ही योग्य वेळ आहे. आमच्या वाढीच्या योजना साकार करण्याला हे नवे कार्यालय चालना देईल. ही एक गतिशील आणि लवचिक वर्कस्पेस असून ती सर्जनात्मक विचारप्रयोगशीलता आणि सहकार्याला वाव देते. हा नवा अध्याय सुरू करताना आमच्या ग्राहकांना आणि भागधारकांना वाढीव लाभ देण्याची आम्हाला आशा आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading