Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

तुळशीबाग श्रीराम मंदिरात श्रीमद््भागवत सप्ताह गुरुवारपासून

पुणे : श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने अधिक मासानिमित्त श्रीमद््भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दिनांक २७ जुलै ते बुधवार, दिनांक २ आॅगस्ट दरम्यान दररोज दुपारी ४ ते सायंकाळी ७ यावेळेत श्रीराम मंदिरात हा सप्ताह होणार असल्याची माहिती संस्थानचे कार्यकारी विश्वस्त श्रीपाद चंद्रकांत तुळशीबागवाले यांनी दिली.

मोहना चितळे यांच्या अमोघ वाणीतून कथा ऐकण्याची संधी यानिमित्ताने पुणेकरांना मिळणार आहे. संस्थानचे कार्यकारी विश्वस्त श्रीपाद चंद्रकांत तुळशीबागवाले यांसह विश्वस्त राघवेंद्र तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, डॉ.रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवाराने या सप्ताहाचे आयोजन केले आहे. भाविकांना विनामूल्य प्रवेश असून मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading