सुपरबॉटम्स’सह मनात अपराधी भावना न ठेवता डायपरिंगचा पर्याय निवडता यावा यासाठी आलिया भट आणि पल्लवी उटगी एकत्र आल्या आहेत
तान्ही मुले आणि माता यांच्याशी संबंधित शाश्वत पद्धतीने बनविलेल्या वस्तूंचे भारतातील आघाडीचे ब्रॅंड सुपरबॉटम्सने भारतातील प्रसिद्ध सुपर स्टार आलिया भट यांना गुंतवणूकदार आणि ब्रॅंड अॅम्बॅसेडर म्हणून जाहीर केले. आलिया भट यांनी ब्रॅंडच्या संस्थापिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुश्री पल्लवी उटगी; ज्या दर्जेदार, कल्पक, १००% शाश्वत आणि सेंद्रिय अशा कॉटन कपड्यांचे डायपर बनवून तान्ही मुले आणि माता यांच्याशी संबंधित उत्पादनांच्या उद्योग क्षेत्रात क्रांती आणीत आहेत; यांच्यासोबत ब्रॅंडला ‘आत्म निर्भर’ करून पुढे जाण्यासाठी हातमिळवणी केली आहे.
सुपरबॉटम्स ‘मनात अपराधी भावना न ठेवता डायपरचा वापर’ (गिल्ट फ्री डायपरिंग) याबाबत भारतात क्रांती आणण्यासाठी नेतृत्व करीत आहे. पालकांना आपल्या मुलांच्या आरोग्याबाबत आणि पृथ्वीच्या पर्यावरणाबाबत कोणतीही अपराधी भावना मनात न ठेवता डायपरचा वापरता करता यावा, केवळ या एकाच उद्देशाने सुपरबॉटम्स ही क्रांती आणण्याचा प्रयत्न करीत आहे. यूएनओ (UNO) द्वारा समर्थित ‘१२ तास कपड्याचे डायपर’ (12HR Cloth Diaper) हे मिशन तान्ह्या मुलांच्या त्वचेस आणि पर्यावरणास हानिकारक असलेले प्लॅस्टिकयुक्त व हानिकारक रसायने असलेले डायपर टाळून सुरक्षित व शाश्वत कपड्यांच्या डायपरच्या चांगलेपणाची निवड करण्याचा पर्याय पालकांना देते.
याबाबत बोलताना आलिया भट म्हणाली, “चांगल्या गोष्टींच्या सामर्थ्यावर माझा विश्वास आहे आणि त्यामुळे सुपरबॉटमसह माझे बंध लगेच जोडले गेले. एक आई म्हणून मला याची आता जास्त जाणीव आहे की, आपण आपल्या मुलांना भविष्यात एक चांगली व आरोग्यदायी पृथ्वी देण्यासाठी बांधील आहोत. मला दुसऱ्या एका अशा आईसोबत भागीदारी करताना खूप आनंद होत आहे जिची ‘जाणीवपूर्वक निवड’ याला सशक्त बनवणे ही स्वप्नदृष्टी माझ्या विचारांशी व ध्येयाशी सुसंगत आहेत. त्यांची अनोखी, कल्पक आणि नावीन्यपूर्ण उत्पादने शाश्वततेला देखील तेवढेच महत्व देतात जेवढे सुरक्षा आणि गुणवत्तेला आणि त्यामुळे ही उत्पादने सर्व पालकांसाठी अपराधी भावनेपासून मुक्त असलेले पर्याय बनतात.”
आलिया भट ही भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक असून तिने नेहमीच शाश्वत जीवनाचा पुरस्कार केला आहे. त्यामुळे लहान मुले आणि मातांसाठी पर्यावरणपूरक, त्वचेस अनुकूल आणि दर्जेदार उत्पादने विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या सुपरबॉटम्सच्या, ‘पालकत्वाच्या प्रवासात पालकांसाठी एक विश्वासार्ह व मौल्यवान साथीदार बनण्याच्या’, स्वप्नदृष्टीला आलिया भट ही सर्वोत्तम सहाय्यक व उत्तेजना देणारी ठरू शकेल.
ब्रॅंडच्या संस्थापिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुश्री पल्लवी उटगी आलियाचे आपल्या सुपरबॉटम्सच्या कुटूंबात स्वागत करताना म्हणाल्या, “जी स्वतः शाश्वत जीवन पद्धतीची एक महत्वाची पुरस्कर्ती आहे अशा सुप्रसिद्ध आलिया भटला आमच्या या प्रवासात सोबत घेताना आम्ही आनंदाने, ज्याला ‘सातवे आसमान में’ म्हणतात तसे, हवेत तरंगत आहोत. आमचे सारे उद्दिष्टच #MakeClothMainstream (कपड्याला पुनर्जीवित करा) -प्रत्येक नवपालकासाठी विश्वासार्ह साथीदार बनणे आणि डायपर म्हणून कापड ही नवपालकांची आवडती निवड बनवायला मदत करणे हे आहे. आधुनिक काळातील डिस्पोजेबलची सुविधा आणि कापडाच्या सदुपयोगाचे महत्व जाणणारे जुन्या काळातील शहाणपण यांना एकत्र आणणे हे कल्पकता आणि नवनिर्मिती यामुळे शक्य झाले. सुपरबॉटम्ससाठी आलियापेक्षा जास्त चांगल्या ब्रॅंड अॅम्बॅसेडरची आम्ही कल्पनाच करू शकत नाही; कारण तिचे दृष्टिकोन आणि मूल्ये हेच केवळ आमच्या मूल्यांशी जुळणारे आहेत असे नाही तर ती वैयक्तिकरित्या देखील स्वतःच्या बाळासाठी आमच्या ब्रॅंडवर विश्वास ठेवते. तिचा विश्वास, प्रेम आणि पाठिंब्यामुळे -देशातील प्रत्येक कुटूंब प्लॅस्टिकयुक्त डिस्पोजेबलच्या धोक्याला कायमचा निरोप देण्यास सक्षम करणे ही आमची स्वप्नदृष्टी लौकरच सत्यात उतरताना आम्ही पाहू शकतो.”
पल्लवीला जेव्हा बाळ झाले तेव्हा तिला डिस्पोजेबल डायपर वापरायचे नव्हते. तिला काहीतरी असे हवे होते जे तिच्या तान्ह्या मुलाच्या नाजुक व संवेदनशील त्वचेसाठी मुलायम व सुरक्षित असेल आणि त्याचवेळी वापरायला सोयीचे देखील असेल. शिवाय जे पर्यावरणालादेखील हानी पोहोचवणार नाही. त्यावेळी सुपरबॉटमचा जन्म झाला. केवळ भारतातीलच नाही तर जगातील आजपर्यंतचे सर्वात साधे कापडी डायपर निर्माण करून सुपरबॉटम्सने आधुनिक सुविधा आणि जुन्या काळातील सुरक्षितता व शाश्वतता हे दोन्हीमधील सर्वोत्तम देणारे एक अनोखे ‘यूएनओ कापडी डायपर (UNO Cloth Diaper)’ बनवले आहे.
‘सर्वांसाठी एकच आकार फिट होईल’ या वैशिष्ठ्यामुळे सुपरबॉटम्स यूएनओ (UNO) डिस्पोजेबल डायपरपेक्षा जास्त किफायतशीर आहे. ड्राय फील लंगोट, डायपर पँट्स, पॉटी पँट्स या त्यांच्या खास उत्पादनांच्याद्वारे ते डायपरिंगच्या ज्या अन्य गरजा आहेत त्यासुद्धा पूर्ण करतात. त्यांचे MaxAbsorbTM सारखे पिरिअड अन्डर वेअर आणि अशी अनेक उत्पादने ‘शाश्वत निवड’ अजून एक पाऊल पुढे नेतात. भारतातील पहिला आणि एकमेव सीपीएसआयए (CPSIA) ने चाचणी आणि प्रमाणित केलेला सुपरबॉटम्स हा ब्रॅंड २० लाखांपेक्षा जास्त पालकांचा त्यांच्या जाणीवपूर्वक पालकत्वाच्या प्रवासातील साथीदार म्हणून आवडता आणि विश्वासार्ह ब्रॅंड झाला आहे. आम्हाला वारश्याने मिळालेल्या या पृथ्विपेक्षा एक अधिक चांगली, अधिक हरित अशी पृथ्वी आपल्यानंतर पुढच्या पिढीसाठी सोडून जाणे या एक समान ध्येयाने हे सर्व पालक व आम्ही प्रेरित आहोत.
