आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन
पुणे : आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन 26 ते 29 जुलै या कालावधीत घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आले आहे.
आर्ट इंडिया फाउंडेशनने खुला आसमान या उपक्रमाअंतर्गत राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेतील पारितोषिकपात्र निवडक चित्रांचा प्रदर्शनात समावेश आहे. सकाळी 11 ते सायंकाळी सहा या वेळेत प्रदर्शन सर्वांना पाहण्यासाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांच्या हस्ते बुधवारी (26 जुलै) दुपारी 12 वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन आणि पारितोषिक वितरण होणार आहे.
शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांच्या सृजनशीलता आणि कल्पकतेला वाव मिळावा, या उ्देशाने ‘खुला आसमान’ या चित्रकला स्पर्धेचा उपक्रम स्वर्गीय मिलिंद साठे यांनी सुरू केला. त्या अंतर्गत आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. ‘आर्ट इंडिया’च्या विश्वस्त डॉ. प्राची साठे आणि चित्रा वैद्य यांनी ही माहिती कळविली आहे.
