आयोध्या वॉरीयर्स क्रिकेट क्लबचा विजयी चौकार; फोनिक्स् इलेव्हन, एकदंत इलेव्हन संघांची विजयी कामगिरी
तिसरी ‘मान्सुन लीग’ टी-२० क्रिकेट स्पर्धा
मुकूंदनगर येथील कटारीया हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या सामन्यात अनिल मांडके याच्या अष्टपैलू खेळीमुळे फोनिक्स् इलेव्हन संघाने जॅग्वॉर्स क्रिकेट क्लबचा पराभव केला. जॅग्वॉर्स संघाला १२९ धावांमध्ये रोखल्यानंतर फोनिक्स् संघाने हे आव्हान १५.३ षटकात व ४ गडी गमावून पूर्ण केले. मधूर जेठीला याने अर्धशतकी खेळी केली.
सुदर्शन गुणे याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अपराजित एचआरकॅपिटा सोल्युशन्स् संघाचा पराभव करून धक्का दिला. सुदर्शने याने १६ धावात ४ गडी बाद करून एचआरकॅपिटा सोल्युशन्स्च्या डावला खिंडार पाडले आणि ८६ धावांवर गडगडला. एकदंत इलेव्हनने हे आव्हान २ गडी राखून पूर्ण केले.
उत्कंठावर्धक झालेल्या सामन्यात आयोध्या वॉरीयर्स संघाने ब्राईट इलेव्हन संघाचा केवळ २ गडी राखून पराभव केला. आयोध्या वॉरीयर्सने १६७ धावा केल्या. प्रतिउत्तरात ब्राईट इलेव्हनचा डाव १६५ धावांवर मर्यादित राहीला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
जॅग्वॉर्स क्रिकेट क्लबः २० षटकात ७ गडी बाद १२९ धावा (हर्षद वैद्य ३५, अक्षय शिंदे ३०, अनिल मांडके ३-२३) पराभूत वि. फोनिक्स् इलेव्हनः १५.३ षटकात ४ गडी बाद १३० धावा (मधूर जेठीला ५० (३५, ७ चौकार, १ षटकार), देवदत्त देशपांडे २६, अनिल मांडके नाबाद १५, पराग पठाक २-२४; सामनावीरः अनिल मांडके;
एचआरकॅपिटा सोल्युशन्स्ः १५.४ षटकात १० गडी बाद ८६ धावा (निखील शिंदे २१, रोहीत रनावरे २१, सुदर्शन गुणे ४-१६, अभिजीत एल. २-८) पराभूत वि. एकदंत इलेव्हनः १७ षटकात ८ गडी बाद ८९ धावा (दिपेश शेरे २४, अमोल नाजन १२, रोहीत साळुंखे ३-१८, स्नेहलकुमार कासार २-१८); सामनावीरः सुदर्शन गुणे;
आयोध्या वॉरीयर्सः २० षटकात ५ गडी बाद १६७ धावा (चिन्मय बीडकर ५४ (५२, ८ चौकार), गणेश मिसाळ ४२, इम्तियाझ शेख ३१, रोहन कुलकर्णी २-२९) वि.वि. ब्राईट इलेव्हनः २० षटकात ७ गडी बाद १६५ धावा (मिहीर ओक ६२ (४०, ५ चौकार, ४ षटकार), निनाद फाटक नाबाद ३५, निलेश माळी २२, प्रविण कुटवड २-२९); सामनावीरः इम्तियाझ शेख;
