Sunday, May 10, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सुजित पाटकर, डॉ. किशोर बिसुरे यांना कोविड घोटाल्याप्रकरणी ED कडून अटक

मुंबई :खासदार  संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या सुजित पाटकर कोविड घोटाळाप्रकरणी त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. सुजित पाटकर यांच्याबरोबर डॉ. किशोर बिसुरे यांनाही टक करण्यात आली असून काही जणांवर अटकेची टांगती तलवार आहे.

लाईफलाईन हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस कंपनीकडून जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले होते. या कंपनीच्या माध्यमातून अनेक व्यवहार करण्यात आले होते. कोविड काळात जे वैद्यकीय साहित्य खरेदी करण्यात आले होते, त्यामध्ये अनेक गैरव्यवहार आढळून आले होते. या सर्व व्यवहारांचे तपशील अंमलबजावणी संचालनालयाला हवे होते.

असा आरोप केला जातोय की, कोविड सेंटरमध्ये औषधे आणि इतर उपकरणांच्या किमती वाढवून सांगण्यात आल्या होत्या. कोविड सेंटरमध्ये संशयास्पद आर्थिक व्यवहार ईडीला वाटत आहेत.
लाईफलाईन हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेसमध्ये सुजित पाटकर यांच्याबरोबरच आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये डॉ. किशोर बिचुले यांनाही अटक करण्यात आली आहे.

याआधी कोविड जम्बो सेंटर घोटाळ्या संदर्भात ईडीने १४ ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. यावेळी ईडीने डेप्युटी कमिशनर रमाकांत बिराजदार यांचीही चौकशी केली होती. त्यावेळी ते सेंट्रल पर्चेस डिपार्टमेंटचे प्रमुख होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading