Sunday, May 10, 2026
Latest NewsMAHARASHTRA

Crime News: डॉक्टर मुलाने बापाच्याच डोक्यात घातला खलबत्ता

बीड : आयुर्वेदात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत असलेल्या डॉक्टर मुलाने वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना शहरातील अंकुशनगर भागात बुधवारी सकाळी उघडकीस आली. सुरेश काशिनाथ कुलकर्णी (वय ७०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

सुधीर सुरेश कुलकर्णी (वय ३८) असे संशयिताचे नाव आहे. सुमारे तेरा वर्षांपूर्वी आयुर्वेद शाखेतील पदवी घेतलेला सुधीर कुलकर्णी तीन वर्षांपासून याच विषयात पदव्युत्तर पदवीचे (एमडी आयुर्वेद) शिक्षण घेत होता. त्यात अपयश आल्याने तो नैराश्यग्रस्त होता.

दरम्यान, त्याच्या आई-वडिलांनी मंगळवारी रात्री घरी आरती केली. आरती घेऊन वडील सुधीरकडे गेले. ‘मला कशाची आरती देता ..’ असे म्हणून त्याने वडिलांशी भांडण केले. त्यानंतर त्याने लोखंडी खलबत्ता वडिलांच्या डोक्यात मारला. त्यात वडील गंभीर जखमी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पळ काढला.

जखमी सुरेश कुलकर्णी यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. आई सुरेखा कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुलगा सुधीर कुलकर्णी याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला. पोलिस निरीक्षक केतन राठोड तपास करीत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading