अण्णा भाऊ साठे प्रोफेशनल साहित्यिक नव्हते तर सुपर प्रोफेशनल होते – विश्वास पाटील
पुणे : महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल व झोपडपट्टी सुरक्षा दला तर्फे आंतरराष्ट्रीय किर्तीचे थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतीदिना निमित्ताने भारताची धर्मनिरपेक्षता आणि राजकिय नैतिकता, ऐरणीवर आहे ? यावर महाचर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस जेष्ठ साहित्यिक, प्रसिद्ध कादंबरीकार विश्वासराव पाटील होते तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. कुमार सप्तर्षी, (जेष्ठ गांधीवादी विचारवंत), प्रा. रतनलाल सोनग्रा (आंबेडकरी लढ्यातील थोर विचारवंत व जेष्ठ साहित्यिक) आणि कार्यक्रमाचे
स्वागताध्यक्ष भगवानराव वैराट (संस्थापक अध्यक्ष, झोपडपट्टी सुरक्षा दल) हे होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या प्रसंगी डॉ. संदिप बोरसे, (न्युरोलॉजिस्ट तज्ञ), प्रतिभा गायकवाड, हरिभाऊ वाघमारे, अरुणा तांगडे या समाजहितासाठी अहोरात्र झटणाच्या तज्ञ व कार्यकर्त्याचा सन्मान या करण्यात आला.
सप्तर्षी म्हणाले की समाजात वावरताना माणसांनी माणसासारखे वागावे. जातिवादाच्या चौकटीतून बाहेर पडून समाजाचा आणि स्वतःचा उद्धार करावा. अनिष्ट चालीरितींना मूठमाती द्याला हवी. घराच्या बाहेर पडताना भारतीय म्हणून बाहेर पडा. स्वतःची जात, धर्म प्रत्येकाने स्वतःपुरताच ठेवावा. शासनाचे सर्व कायदे सर्वांना समान आहेत. सर्वांनी त्याचा आदर करावा. स्वतःच्या अस्मितेवर आलेली काजळी दूर करावी.
सोनग्रा म्हणाले की कायद्यामध्ये, माणसांमध्ये मी भेदाभेद करणार नाही असा निर्धार केला पाहिजे. या देशात धर्मनिरपेक्षतेचा टिकली पाहिजे. राजकिय नैतिकता, टिकली पाहिजे त्याशिवाय समाजवादी भारत तयार होणार आहे.
विश्वास पाटील म्हणाले की मराठी माणसाला या मराठी मातीला तसेच मराठी साहित्यिकांना, मराठी राजकारण्यांनी अण्णा भाऊंचा योग्य तो अभ्यास केलेला आहे ? अण्णाभाऊंची कथांचा महासागर लिहिलेला आहे. अण्णांच्या असंख्य कथा आहेत आणि प्रत्येक कथा १० ते १२ पानाची आहे. अन्नाची कथा कधी फसलेली नाही परंतु दुर्दैवाने अण्णांचा मराठी साहित्याच्या अध्यक्षपदासाठी कधी विचार झाला नाही. उच्चार झाला नाही कधी त्यांना बोलावलं गेलं नाही ज्या वेळेला पुसदला संमेलन होतं त्यावेळेला अण्णाभाऊ गेले होते त्यांच्या अंगावर स्वतःचा कोट नव्हता. अत्यन्त हालकीच्या परिस्तिथीत अण्णांनी साहित्य लिहले. अण्णाभाऊ प्रोफेशनल साहित्यिक नव्हते तर सुपर प्रोफेशनल होते.
महम्मद शेख, सुरेखा भालेराव, प्रदीप पवार, दत्ता कांबळे, दत्ता डाडर, आबा शिंदे, वंदना पवार, सुनील भिसे, प्रा. सुरेश धिवार यांच्यासह झोपडपट्टी सुरक्षा दलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशिनाथ गायकवाड यांनी केले.
