Monday, May 25, 2026
ENTERTAINMENTLatest News

राजवीर आणि मयूरी यांची नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला.

 ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. त्याची पहिली झलक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडते आहे. प्रेक्षकांचा लाडका अजिंक्य राऊत या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव राजवीर आहे. त्याच्याबरोबर गुणी अभिनेत्री जान्हवी तांबट हीसुद्धा या मालिकेतून विशिष्ट व्यक्तिरेखा साकारताना पाहायला मिळते आहे.  तिच्या व्यक्तिरेखेचं नाव मयूरी असून ती या मालिकेत बॉडीगार्डच्या वेशातसुद्धा  पाहता येणार आहे. आता या दोघांची अजब प्रेमकहाणी कशी असेल, हे लवकरच पाहायला मिळेल. ही ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ लपूनछापून कशी फुलतेय, हे पाहायला मिळेल.

 अभिनेता अजिंक्य राऊत पुन्हा एकदा एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्याचे याआधीचे काम प्रेक्षकांना विशेष आवडले. त्याच्या नव्या भूमिकेची त्याचे चाहते मनापासून वाट पाहत होते. अजिंक्य पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर एका नव्या भूमिकेतून दिसणार आहे. मालिकेचा फर्स्ट लूक प्रेक्षकांना विशेष आवडतो आहे, कारण मालिकेची नायिका जान्हवी तांबट ही वेगळ्या रूपात दिसते आहे. ती चक्क एका बॉडीगार्डच्या वेशात आपल्याला दिसते आहे, तेही पुरुष बॉडीगार्डच्या वेशात. जान्हवी साठी मयुरी आणि भाऊसाहेब या दोन व्यक्तिरेखा साकारणं हे तारेवरची कसरत ठरणार आहे. आता हा बॉडीगार्ड कशा प्रकारे प्रेक्षकांसमोर येईल, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

या मालिकेतून दिग्गज कलाकारांची फळी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजिंक्य राऊत, जान्हवी तांबट, सुनील तावडे आणि दीप्ती केतकर हे कलाकार प्रमुख भूमिकांत या मालिकेतून पाहायला मिळतील. मालिकेचे शीर्षक गीत गुरू ठाकूर यांनी लिहले असून रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांनी ते गायले आहे. प्रेक्षकांना ताल धरायला लावणारे हा शीर्षक गीत असून रोमँटिक असलेले हे शीर्षक गीत रसिकांच्या मनात घर करते आहे. अजय मयेकर हे या मालिकेचे दिग्दर्शन करत आहेत आणि त्यांच्या अजय मयेकर फिल्म्स या निर्मिती संस्थेकडून या मालिकेची निर्मिती करण्यात येत आहे. तर आता सोनी मराठीवर ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ ही मालिका १७ जुलैपासून सायंकाळी  ७.३० वाजता  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading