Monday, May 25, 2026
BusinessLatest News

टीमलीज एडटेकने ‘डिजिवर्सिटी’ लाँच केले

मुंबई : टीमलीज एडटेक या भारतातील आघाडीच्या अध्ययन सोल्यूशन्स प्रदाता कंपनीने आज क्रांतिकारी तंत्रज्ञान-केंद्रित प्लॅटफॉर्म डिजिवर्सिटीच्या लाँचची घोषणा केली. हा प्लॅटफॉर्म उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अध्ययनासह वास्तविक विश्वातील अनुभव देतो. या प्लॅटफॉर्मचा भारतातील उच्च शिक्षणामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचा आणि विद्यार्थ्यांना कार्यस्थळी आवश्यक असलेल्या कौशल्यांसह, तसेच दीर्घकाळपर्यंत यशस्‍वी करिअरसाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक ज्ञानासह सक्षम करण्याचा मनसुबा आहे.

डिजिवर्सिटीने नाविन्यपूर्ण कामाशी संबंधित पदवी अभ्यासक्रम देण्यासाठी भारतातील अव्वल १० युनिव्हर्सिटी आणि १५० हून अधिक आघाडीच्या नियोक्त्यांसोबत सहयोग केला आहे, ज्यामधून शिक्षण व रोजगारामधील अंतर भरून काढण्याच्या दिशेने पुढाकार घेतला आहे. हा प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाबाबत योग्य निवड करण्यास आणि त्यांना महाविद्यालयीन शिक्षणासोबत व्यावहारिक कामाचा अनुभव मिळण्यास सक्षम करतो. डिजिवर्सिटीएनईपी २०२० ने आखलेल्या भारतातील उच्च शिक्षणाच्या भवितव्याच्या दृष्टिकोनाला सादर करते.

टीमलीज एडटेकचे संस्थापक व सीईओ शंतनू रूज म्हणाले, ‘‘डिजिवर्सिटी भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यास सज्ज आहे. पुढील पाच वर्षांमध्ये आम्ही प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यासाठी आणि १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी १०० कोटी रूपयांची गुंतवणूक करू. आज नियोक्त्यांची मागणी असलेली कौशल्ये नियोक्त्यांसोबत सहयोगाने अध्ययनाच्या माध्यमातून संपादित करता येऊ शकतात हे आम्ही ओळखले आहे. विद्यार्थ्यांना रोजगार बाजारपेठेत मागणीपर कौशल्यांसह सुसज्ज करण्याचा आणि भावी कर्मचारीवर्गाला आकार देण्याचा मनसुबा आहे.’’

कंपनीने या वर्क इंटीग्रेटेड डिग्री प्रोग्राम्सची पोहोच अधिक वाढवण्यासाठी विविध पीएसयूंसोबत देखील सहयोग केला आहे; बोर्ड ऑफ अॅप्रेन्टिसशीप ट्रेनिंग (बीओएटी-डब्ल्यूआर), सीएससी अकॅडमी, आसाम इलेक्ट्रॉनिक्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एएमटीआरओएन), तेलंगणा सरकार, एपीएससीएचई (एपी स्टेट कौन्सिल ऑफ हायर एज्युकेशन) या काही पीएसयू आहेत, ज्यांच्यासोबत कंपनीने सहयोग केला आहे. लाँच करण्यात आलेले डिजिवर्सिटी नियोक्त्यांना व युनिव्हर्सिटींना सामना कराव्या लागणाऱ्या महत्त्वपूर्ण आव्हानांचे निराकरण करते. बहुतांश नियोक्ते तक्रार करतात की ते कुशल टॅलेंट नियुक्त करण्यासोबत कायम ठेवण्यामध्ये अयशस्वी ठरतात, तर दुसरीकडे, युनिव्हर्सिटींना त्यांच्या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण व कौशल्य निर्मितीचे ज्ञान देण्यामध्ये संघर्ष करावा लागतो, ज्यामुळे ते त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगारक्षम बनू शकतील. युनिव्हर्सिटी व नियोक्त्यामधील सहयोग दोन्ही क्षेत्रांना एकत्र आणू शकतो आणि विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरू शकतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading