पीएमपीएमएल कडून दोन बसमार्गांचा विस्तार
लोहगांव व खराडीकरांना दिलासा.
बसमार्ग क्र. १७९ हडपसर ते विमाननगर या मार्गाचा विस्तार लोहगांव पर्यंत.
बसमार्ग क्र. २२५ हिंजवडी माण फेज ३ ते विमाननगर या मार्गाचा विस्तार खराडीगांव पर्यंत.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या मागणीनुसार बसमार्ग क्र. १७९ हडपसर ते विमाननगर या
मार्गाचा विस्तार लोहगांव पर्यंत व आयटी कंपन्यामध्ये कामकाज करणाऱ्या कामगारांच्या मागणीनुसार बसमार्ग क्र. २२५
हिंजवडी माण फेज ३ ते विमाननगर या मार्गाचा विस्तार खराडीगांव पर्यंत गुरुवार दिनांक ६ जुलै २०२३ पासून करण्यात
आला आहे. त्यामुळे लोहगांव व खराडीगांव येथून प्रवास करणाऱ्या प्रवासी यांना दिलासा मिळाला आहे.
बसमार्गांचा तपशील खालीलप्रमाणे
मार्ग क्रमांक १७९ – हडपसर ते लोहगांव.
मार्गे – सिंबायोसिस कॉलेज, विमाननगर, लोहगांव विमानतळ, केंद्रीय विद्यालय, बर्मासेल.
बस संख्या – १.
वारंवारिता – २ तास ३० मिनिटे.
मार्ग क्रमांक २२५ – हिंजवडी माण फेज ३ ते खराडीगांव.
मार्गे – विमाननगर कॉर्नर, चंदननगर, रक्षकनगर, आयटी टॉवर, खराडीगांव.
बस संख्या – २.
वारंवारिता – २ तास.
या बससेवेचा लाभ प्रवाशी नागरीक, विद्यार्थी, नोकरदार, महिला वर्ग व ज्येष्ठ नागरीक यांनी घ्यावा असे आवाहन
परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.
