भीषण अपघात : भरधाव कंटेनर हॉटेलमध्ये घुसला; 12 जणांचा जागीच मृत्यू
धुळे : येथे मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव कंटेनर हॉटेलमध्ये घुसल्याने हा विचित्र अपघात झाला. या अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, २० जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. दरम्यान, ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार, आज (दि. 4) सकाळी पावणे आकाराच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ इंदोर कडून धुळ्याकडे जाणाऱ्या रोडवर (महामार्ग क्रमांक 3) हा अपघात घडला. भरधाव कंटेनर ब्रेक फेल झाल्याने दोन फेरीवाले, एक होंडा अमेज आणि एक कंटेनर यांना धडक देऊन पुढे सद्गुरू हॉटेल मध्ये जावून धडकला. कंटेनरचा वेग इतका प्रचंड होता की हॉटेलमध्ये घुसून सुद्धा कंटेनर थांबला नाही. पुढे हा कंटेनर बस थांबा तोडून रोडवर पलटी झाला.
दरम्यान, या विचित्र अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, २० जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. तसेच अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
