Wednesday, June 17, 2026
BusinessLatest News

पुण्यातील तीन कंपन्यांची ‘टॅली एमएसएमई ऑनर्स २०२३’मध्ये बाजी 

पुणे : सॉफ्टवेअर उत्पादनांच्या उद्योगक्षेत्रातील अग्रणी कंपनी टॅली सोल्यूशन्सने आज पश्चिम विभागासाठी ‘एमएसएमई ऑनर्स’च्या तिसऱ्या पुष्पाच्या विजेत्यांची घोषणा केली. पुण्यातील मेराकी आयटिनरीज, प्लॅनेज कन्सल्टन्सी आणि कृष्ण पॅकेजिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी ५००० जागतिक नामांकनांमधून बाजी मारली.

टॅली एमएसएमई ऑनर्स हा देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये विशेष योगदान देणाऱ्या व्यवसाय आणि उद्योजकांना ओळखून त्यांचा सन्मान करणारा वार्षिक उपक्रम आहे. हा उपक्रम एमएसएमईजनी त्यांच्या सर्वोत्तकृष्ट कार्यपद्धतींद्वारे तळागाळामध्ये केलेला सकारात्मक प्रभाव आणि विविधतेला जाणून त्यांचा सन्मान करतो. हे या उपक्रमाला एक सर्वसमावेशक पुरस्कार बनवते; जे १,२ आणि ३ टीअर अशा सर्व प्रकारच्या शहरांमधील, सर्व विभागांमधील, देशाच्या प्रगतीमध्ये प्रभाव टाकणाऱ्या व देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेणाऱ्या मात्र कौतुक व सन्मान न मिळालेल्या खऱ्या नायकांचा सन्मान करते. हे सन्मान वर्षातून एकदा आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिनानिमित्ताने दिले जातात आणि २५० कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या आणि वैध जीएसटीआयएन (GSTIN) असलेल्या सर्व प्रकारच्या व्यवसायांना लागू होतात.

मेराकी आयटिनरीजमधील शमीका जोशी यांना गोल्ड स्टँडर्ड ट्रॅव्हल पॅकेजेस तयार करण्यासोबतच प्रशिक्षण आणि उच्च कौशल्ये वाढवण्यास प्राधान्य देणारी ट्रॅव्हल आणि टुरिझम कंपनी चालू केल्याबद्दल ‘वंडर वुमन’ श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आले. कंपनी ट्रॅव्हल आणि टुरिझम विषयातील पायाभूत प्रशिक्षण देखील प्रदान करीत असल्यामुळे अनेक लोकांना प्रमाणित प्रशिक्षण मिळवून देण्यात व नोकऱ्या निर्माण करण्यात मदत झाली आहे.

प्लॅनेज कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेडमधील नेहा लद्दड आणि कृष्ण पॅकेजिंग प्रायव्हेट लिमिटेडमधील श्याम भूतडा या दोघांनाही ‘टेक ट्रान्सफॉर्मर’ श्रेणीत पुरस्कार देण्यात आला. नेहा लद्दड आणि प्लॅनेज कन्सल्टन्सी यांना बीआयएम आणि ड्रोन सर्वेक्षणाचा वापर करून ग्राहकांना त्यांच्या प्रकल्पांची प्रगती दुरस्थपणे पाहता यावी यासाठी मदत करण्याच्या त्यांच्या कार्यासाठी त्यांना हा सन्मान दिला गेला. श्याम भूतडा आणि कृष्ण पॅकेजिंग यांना कामकाज आणि प्रशासकीय प्रक्रियांमध्ये प्रभाव निर्माण करण्यासाठी त्यांच्या नावीन्यपूर्ण व कल्पक डिजिटल ऑटोमेशनच्या वापरासाठी हा सन्मान दिला गेला.

    या तिसऱ्या पुष्पामध्ये ‘टॅली एमएसएमई ऑनर्स’ने प्राधान्यकृत बँकिंग भागीदार डीबीएस बँक (DBS Bank) आणि सहाय्यक भागीदार यूनिकॉमर्स (Unicommerce) व बाइटएज (byteEDGE) यांच्या सहभागीदारीने पुण्यातील तीन एमएसएमई (MSME) आणि भारतातील १०० तीन एमएसएमई (MSME) चा सन्मान केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading