सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती संपन्न
पुणे : आपल्या कृतीतून सामाजिक समतेचा संदेश देणारे लोकोत्तर महाराज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात साजरी करण्यात आली. त्यांचा जयंतीदिन महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिन म्हणून पाळला जातो. जयंतीनिमित्त आणि सामाजिक न्याय दिनाच्या औचित्याने विद्यापीठ आवारातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, वित्त व लेखाधिकारी श्रीमती चारुशीला गायके, अधिष्ठाता डॉ. दीपक माने, डॉ.विजय खरे, अधिसभा सदस्य डॉ. राजेंद्र घोडे, मुकुंद पांडे, विद्यार्थी विकास मंडळ प्रभारी संचालक डॉ. अभिजित कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सदानंद भोसले, डॉ. विलास आढाव, डॉ. अपर्णा राजेंद्र तसेच विविध शैक्षणिक विभागांचे विभागप्रमुख, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
