MPSC : दर्शना पवार हत्याकांडाची पुण्यात पुनरावृत्ती; तरुणीवर कोयत्याने हल्ला
पुणे : MPSC परीक्षा उत्तीर्ण दर्शना पवार हत्या प्रकरण ताजे असतानाच आज (दि. 27) पुणे शहरात पुन्हा एकदा एम पी एस सी करणाऱ्या तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील मध्यवर्ती परिसरात सदाशिव पेठ येथे सकाळी आकाराच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने आजूबाजूचे नागरीक मधे पडल्यामुळे तरुणीचे प्राण वाचले आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
अशी घडली घटना
संबंधीत पिडीत तरुणी आपल्या आईसोबत कॉलेजला जायाला निघाली होती. मध्ये रस्त्यात आई या तरुणीला सोडून आपल्या कामाच्या ठिकाणी गेली. तर तरुणी आपल्या ओळखीच्या मुलांच्या गाडीवर बसून कॉलेजच्या दिशेने जात होती. मात्र रस्त्यात आरोपी दबा ठेवून बसला होता. तरुणीला दुसऱ्याच्या गाडीवर बसल्याचे पाहून आरोपीने त्यांची दुचाकी आडवली व सॅकमध्ये ठेवलेला कोयता काढून त्या तरुणीच्या मित्रावर वार करू लागला. मात्र दुचाकीस्वार त्या हल्ल्यातून बाचावला. नंतर आरोपी संबधी तरुणीच्या मागे पळत तिच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात तरुणीच्या डोक्याला जखम झाली व टी खाली कोसळली. दरम्यान प्रसंग अवधान साधत आजूबाजूच्या नागरीकांनी आरोपीला आवरण्याचा प्रयत्न केला. पण आरोपी त्यांनांही ऐकेना. शेवटी लेशपाल जवळगे या तरुणाने आरोपीला पकडले व पोलिसांच्या हवाली केले.
दरम्यान, संबंधीत आरोपी आणि पिडीत तरुणी हे एकमेकांना आधीपासून ओळखतात. आरोपीने या तरुणीला लग्नासाठी विचारणा देखील केली होती. मात्र संबंधीत तरुणीने लग्नाला नकार दिला. तेव्हा पासून हा आरोपी या तरुणीला वारंवार फोन कॉल करत होता. तसेच लग्नाला तयार हो नाहीतर जीवे मारेन अशी धमकी देखील देत होता. याबाबत तरुणीच्या कुटूंबीयांना देखील माहिती होती.
