गोल्डन वुमन आयकॉन अवॉर्ड्स ट्रॉफीचे अनावरण
पुणे : विविध क्षेत्रात अतुलनीय योगदान देत आपल्या कार्यकर्तृत्त्वाचा ठसा उमटवणाऱ्या, नारी शक्तीचा सन्मान ‘गोल्डन वुमन आयकॉन अवॉर्ड्स’ पुरस्काराने केला जाणार आहे. मनोरंजन, उद्योग आणि लाईफस्टाईल अशा क्षेत्रांमधून जवळजवळ 30 विभागांतून ज्युरी पॅनेलच्या सहाय्याने महिलांना, हे विशेष पुरस्कार दिले जाणार आहेत. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ’गोल्डन वुमन आयकॉन अवॉर्ड्स’ चा रंगतदार सोहळा पुण्यात रंगणार आहे.
त्याआधी सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ ज्योतिर्विद श्री आनंद पिंपळकर यांच्या हस्ते शो च्या आकर्षक ट्रॉफीचे अनावरण संपन्न झाले. श्री.आनंद पिंपळकर यांनी वेगळ्या संकल्पनेचे कौतुक करत ह्या उपक्रमासाठी खूप शुभेच्छा दिल्या. ’गोल्डन वुमन आयकॉन अवॉर्ड्स’ ह्या शो ची निर्मिती आणि संकल्पना ओंकार माने व सूर्या प्रोडक्शन्सची असून, चित्रपट-मालिका -म्युझिक व्हिडीओजच्या दिग्दर्शनानंतर पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. एन एम एन्टरप्रायझेसचे निलेश मुणगेकर व निर्मल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे डॉ निरंजन निर्मल यांच्या विशेष सहयोगाने हा अवॉर्ड शो साकारणार आहे.
या कार्यक्रमाला दिपीका अग्रवाल, अनाहिता कपूर, डॉ आकांक्षा गोसावी, अक्षदा बर्गे, पूर्णिमा सैंदाणे, नेहा सानप, डॉ विवेकानंद सानप, अमित बाम्बोली, लकी शेख, पूर्वा शाह व अभिनेता प्रणव पिंपळकर आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.
