चित्रकला कार्यशाळा संपन्न
मुंबई : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कला,क्रिडा, शिक्षण सामाजिक बहुउद्देशीय संस्था अंतर्गत रंगविहार आर्ट स्टुडिओ द्वारा आयोजित चित्रकला कार्यशाळा लहान मोठे सर्व कलाप्रेमी कलारसीका करीता नुकतेच एल्फिन्स्टन काॅलेज जवळील, कोकण आयुक्त विभाग यांच्या आवारामधे महात्मा गांधी रोड, फोर्ट मुंबई येथे चित्रकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेची सुरुवात सन्मानीय डाॅ. भूषण कुमार उपाध्येय सर पोलीस महासंचालक तथा महासमादेशक होमगार्ड व नागरी संरक्षण मुंबई – ३२यांचे हस्ते दिप प्रज्वलित करून करण्यात आले. या कार्यशाळेत कलाकार, कलारसिक, कलाप्रेमी बहुसंख्येने सहभागी होऊन, मनसोक्त पणे दोन तास कलारंगात रंगून गेली.
अशाप्रकारच्या कार्यशाळा ही संस्था नेहमीच वेगवेगळय़ा ठिकाणी घेत असते. सामान्य माणूसही चित्रकलेशी जोडला जावा, सामान्य माणसातही चित्रकलेची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने ही संस्था कार्य करीत आहे.
या पुढेही अशा प्रकारच्या चित्रकला कार्यशाळा वेगवेगळ्या ठिकाणी सुरूच ठेऊन, सामान्य माणसला कलेशी जोडणे सुरूच राहील असे संस्थेच्या अध्यक्ष धम्मपाल किर्दक यांनी सांगीतले.